सनी देओलचा मुलगा करण देओल मेट्रोने प्रवास करतो तेव्हा...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:05 PM2019-02-05T14:05:07+5:302019-02-05T14:06:35+5:30

बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येतोय. तो म्हणजे, सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल.

sunny deol son karan deol taking metro everyday to reach his debut film pal pal dil ke paas set | सनी देओलचा मुलगा करण देओल मेट्रोने प्रवास करतो तेव्हा...!!

सनी देओलचा मुलगा करण देओल मेट्रोने प्रवास करतो तेव्हा...!!

googlenewsNext

बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येतोय. तो म्हणजे, सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करण बॉलिवूड डेब्यू करतोय. करणचा हा डेब्यू सिनेमा खुद्द पापा सनी देओल दिग्दर्शित करतोय.


१८ मे २०१७ रोजी या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आणि ते अद्यापही सुरु आहे. याकाळात सनीने  ‘पल पल दिल के पास’च्या सेटवरचे अनेक फोटो शेअर केलेत. पण आपण आपल्या मुलाला सेटवर मुलासारखे नाही तर एका सामान्य कलाकाराप्रमाणे वागणूक देतो, हे सनीने कधीच सांगितले नाही. होय, ही गंमत नाही तर खरे आहे. सनी पाजी आपल्या मुलाला अगदी सामान्य कलाकाराप्रमाणे वागवतो. कदाचित म्हणूनचं करण दररोज मेट्रोने सेटवर पोहोचतो. करणचा हा ताजा व्हिडीओ तरी हेच सांगणारा आहे.


व्हिडीओत करण आपल्या मित्रासोबत मेट्रोमधून प्रवास करताना दिसतोय. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोने सेटवर पोहोचण्यास कमी वेळ लागतो. त्यामुळे करण गाडीऐवजी मेट्रोनेच प्रवास करणे पसंत करतो. सकाळी सकाळी रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक असते. ते टाळण्यासाठी तो रोज मेट्रोने सेटवर येतो. आहे ना आश्चर्य...
करण देओलचा  ‘पल पल दिल के पास’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. याचे पहिले शेड्यूल मनालीत शूट केले गेले. या चित्रपटात करणच्या अपोझिट सहर लाम्बा हा नवा चेहरा बॉलिवूडमध्ये लॉन्च होतोय.

Web Title: sunny deol son karan deol taking metro everyday to reach his debut film pal pal dil ke paas set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.