ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून सनीच्या आणि डिम्पल कपाडियाच्या अफेअरची चर्चा आहे. ऐंशीच्या दशकात त्या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्या काळापासूनच त्यांचे अफेअर सुरू असल्याचे म्हटले जाते.

अभिनेता सनी देओलने दामिनी, गदर, डर, बॉर्डर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तो सध्या पल पल दिल के पास या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करत असून या चित्रपटाद्वारे त्याचा मुलगा करणला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. सनीने अभिनयानंतर आता त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. त्याने संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आता तो पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार आहे. 

सनी देओल निवडणूक लढणार याची काल घोषणा झाल्यापासून सनीच्या नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. सनीच्या अभिनयासोबतच त्याच्या खाजगी आयुष्याची देखील नेहमीच चर्चा रंगते. सनीचे आजवर कोणकोणत्या अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आले आहे याविषयी जागरणने एक बातमी दिली आहे. त्यांनी या बातमीत त्याच्या डिम्पल कपाडिला, मिनाक्षी शेषाद्री, रवीना टंडन आणि अमृता सिंग सोबतच्या अफेअरविषयी सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सनीच्या आणि डिम्पल कपाडियाच्या अफेअरची चर्चा आहे. ऐंशीच्या दशकात त्या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्या काळापासूनच त्यांचे अफेअर सुरू असल्याचे म्हटले जाते. त्या दोघांना काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये हातात हात घालून फिरताना पाहाण्यात आले होते. 

रवीना आणि सनीने जिद्दी, क्षत्रिय यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांमध्ये अफेअर सुरू झाले असल्याचे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी मीडियात त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा झाली होती. 

अमृता सिंग आणि सनी देओलने बेताब या चित्रपटाद्वारे त्यांच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी त्या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. त्यावेळी सनीचे लग्न पूजासोबत झाले होते. पण सनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याने ही गोष्ट त्याच्या कुटुंबियांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. अमृताला देखील सनीचे लग्न झाले हे माहीत नव्हते. सनी आणि अमृता एकमेकांमध्ये गुंतत चालले आहेत हे सनीच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने अमृताला चांगलेच सुनावले असल्याचे म्हटले जाते.

मिनाक्षी शेषाद्री आणि सनीने डकैत या चित्रपटात सगळ्यात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. यानंतर त्या दोघांच्या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले. दामिनी या चित्रपटाच्यावेळी त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा झाली होती.

Web Title: Sunny Deol Had Extra Marital Affairs With These Actresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.