ठळक मुद्दे टाईम्स फ्रेश फेस २०१६ ची विजेती राहिलेली सहर सध्या मुंबईत शिक्षण घेत आहे.

बॉलिवूडचे अनेक दिग्गज दिग्दर्शक व निर्मात्यांत बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्सच्या मुलांना लॉन्च करण्याची शर्यत लागली असताना सनी देओलने मात्र स्वत:च्या मुलाला स्वत:च लॉन्च करण्याचा जिम्मा उचलला. होय, ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून सनी देओल आपला मुलगा करण देओल याला लॉन्च करतोय. या चित्रपटात करण देओलसोबत सहर बाम्बा ही सुद्धा बॉलिवूड डेब्यू करतेय. 


 टाईम्स फ्रेश फेस २०१६ ची विजेती राहिलेली सहर सध्या मुंबईत शिक्षण घेते आहे. सहरला हिरोईन बनायचे होते आणि म्हणून ती मुंबईत आली. अंधेरीच्या आरामनगर भागात रोज येणे आणि ऑडिशन्स देणे हे गेल्या कित्येक वर्षांपासून ती करत होती. अचानक एकेदिवशी तिला अशाच एका ऑडिशन्ससाठी फोन आला.

पहाटे पाचला उठून सहर ऑडिशनसाठी गेली आणि फर्स्ट लूक ओके झाल्यावर सहरला ‘पल पल दिल के पास’ हा सिनेमा मिळाला. पण या चित्रपटाचा पहिला सीन ओके करताना सहर अगदी रडकुंडीला आली. होय, नुकत्याच एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले.


‘या सिनेमाचा पहिला सीन मी कधीच विसरू शकणार नाही. या सीनमध्ये मला दम लागेस्तोवर पळायचे होते. मी पळत होते पण धाप लागण्याचे भाव काही केल्या माझ्या चेह-यावर येत नव्हते. सकाळपासून लंचब्रेकपर्यंत मी शॉट देत होते. पण तो ओके होत नव्हता. मी निराश झाले आणि आईला फोन करून रडू लागले. कदाचित हे सगळे मी नाही करू शकणार, असे मी आईला म्हणाल्याचे मला आठवते. पण सनी सर हार मानणाºयापैकी नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा हा शॉट घेतला आणि तो ओके झाला. त्यानंतर मी पहिल्यांदा स्वत:ला मॉनीटरवर पाहिले, ’ असे सहरने सांगितले.


 

Web Title: sunny deol film pal pal dil ke pas acteress sahher bambba interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.