सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूडमध्ये करतोय पदार्पण, झळकणार तारा सुतारियासोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 12:30 PM2021-03-02T12:30:45+5:302021-03-02T12:31:30+5:30

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Sunil Shetty's son Ahan is making his Bollywood debut with Tara Sutaria | सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूडमध्ये करतोय पदार्पण, झळकणार तारा सुतारियासोबत

सुनील शेट्टीचा मुलगा अहान बॉलिवूडमध्ये करतोय पदार्पण, झळकणार तारा सुतारियासोबत

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तडप चित्रपटात तारा सुतारियासोबत दिसणार आहे. तडप चित्रपटात एक लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. तारा सुतारियाने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत रिलीज डेटबद्दल सांगितले आहे. 

अभिनेत्री तारा सुतारियाने तडपचे पोस्टर शेअर करत लिहिले की, एक लव्ह स्टोरी खूप साऱ्या इमोशन्ससोबत. साजिद नाडियादवालाची लव्हस्टोरी तडपमधील जादूचा अनुभव घ्या. हा चित्रपट २४ सप्टेंबर, २०२१ ला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.


अक्षय कुमारनेदेखील अहानला बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत असल्यामुळे पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने तडपचे पोस्टर शेअर करत लिहिले की, तुझ्यासाठी मोठा दिवस आहे अहान. मला आजही आठवते की तुझे वडील सुनील शेट्टीचा पहिला चित्रपट बलवानचे पोस्टर आणि आज तुझ्या चित्रपटाचे पोस्टर प्रिसेंट करतो आहे. तडपचे पोस्टर शेअर करताना मला आनंद आणि गर्व वाटतो आहे. तडप २४ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


अक्षय कुमार सध्या साजिद नाडियादवालाच्या प्रोडक्शन हाउस अंतर्गत बनत असलेला चित्रपट बच्चन पांडेचे शूटिंग जैसलमेरमध्ये करतो आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत क्रिती सनॉन, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Sunil Shetty's son Ahan is making his Bollywood debut with Tara Sutaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.