ठळक मुद्देसुलक्षणा पंडित यांनी अधिकाधिक चित्रपटांमध्ये संजीव कुमार यांच्यासोबतच काम केले. संजीव कुमार आज हयात नाहीत. पण एकेकाळी सुलक्षणा पंडित त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या.

हेरा फेरी, अपनापन, खानदान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला सुलक्षणा पंडित या अभिनेत्रीला पाहायला मिळाले होते. सुलक्षणा यांच्या सौंदर्याची त्याकाळी चांगलीच चर्चा होती. सुलक्षणा पंडित यांच्या कुटुंबियातील अनेकजण बॉलिवूडशी संबंधित आहेत. अभिनेत्री विजेता पंडित ही सुलक्षणा पंडित यांची बहीण असून संगीतकार जतीन-ललीत हे त्यांचे भाऊ आहेत. सुलक्षणा पंडित या गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडत्या झगमगत्या दुनियेपासून दूर आहेत. 

सुलक्षणा पंडित या आता इतक्या वेगळ्या दिसतात की, त्यांना ओळखणे देखील कठीण आहे. त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्यांनी लग्न न करण्यामागे एक कारण आहे.

सुलक्षणा या चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच खूपच चांगल्या गायिका देखील होत्या. त्यांनी किशोर कुमार, मोहम्मद रफी या त्या काळच्या आघाडीच्या गायकांसोबत गाणी गायली आहेत. सुलक्षणा पंडित यांनी अधिकाधिक चित्रपटांमध्ये संजीव कुमार यांच्यासोबतच काम केले. संजीव कुमार आज हयात नाहीत. पण एकेकाळी सुलक्षणा पंडित त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. संजीव कुमार यांना पाहातचक्षणी त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्यासोबत लग्न करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले होते. पण संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडत होत्या. हेमा मालिनी यांच्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्याचा ते विचार देखील करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुलक्षणा पंडित यांना नकार दिला. त्यानंतर काहीच वर्षांत अचानक संजीव कुमार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सुलक्षणा यांनी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. एवढेच नव्हे तर त्यांचे मानसिक संतुलन देखील ढासळले. ही गोष्ट सुलक्षणा यांची बहीण विजेता पंडित यांनीच स्वतः मीडियाला सांगितली होती.

सुलक्षणा अनेक वर्षांपासून बिछान्याला खिळलेल्या असून त्या विजेतासोबतच राहातात. विजेता यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सुलक्षणा दीदी दिवसातील अनेक तास तिच्या रूमममध्येच घालवते. संजीव कुमार यांनी प्रेमाचा स्वीकार न केल्याने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले आणि त्यात संजीव कुमार यांचा अतिशय कमी वयात मृत्यू झाल्याने तिचे मानसिक संतुलन अधिकच बिघडले. संजीव कुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षं दीदी एकटीच राहात होती. पण तिची तब्येत अधिक ढासळल्याने मी तिला घरी घेऊन आले. तेव्हापासून ती माझ्यासोबतच राहात आहे. काही वर्षांपूर्वी ती बाथरूममध्ये पडली होती आणि त्यामुळे तिच्या कंबरेला जबर मार बसला होता. तेव्हापासून तिला धड चालता देखील येत नाही. ती अथंरुणालाच खिळून आहे. तिला कोणालाही भेटायला आवडत नाही. तसेच ती कोणाशी जास्त बोलतदेखील नाही.

Web Title: Sulakshana pandit left bollywood after Sanjeev Kumar death Psc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.