सुहाना खानने भाऊ आर्यनच्या मर्जी विरोधात शेअर केला फॅमिली फोटो, म्हणाली- तो मला पोस्ट करू देत नव्हता

By गीतांजली | Published: November 4, 2020 06:46 PM2020-11-04T18:46:28+5:302020-11-04T18:57:14+5:30

शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय स्टार किड्स आहे.

Suhana khan shares picture from shah rukh khan birthday celebrations against brother aryan wish see here | सुहाना खानने भाऊ आर्यनच्या मर्जी विरोधात शेअर केला फॅमिली फोटो, म्हणाली- तो मला पोस्ट करू देत नव्हता

सुहाना खानने भाऊ आर्यनच्या मर्जी विरोधात शेअर केला फॅमिली फोटो, म्हणाली- तो मला पोस्ट करू देत नव्हता

googlenewsNext

शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय स्टार किड्स आहे. सुहानाने अजून फिल्मी जगात पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही त्याआधीच ती हिट आहे. कोणत्याना कोणत्या कारणामुळे ती नेहमी चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटोंमुळे चर्चेत असते. सुहानाने भाऊ आर्यन खानच्या इच्छेविरोधात एक फोटो पोस्ट केला आहे. ही माहिती सुहानाने स्वत: सोशल मीडियावर दिली. 

सुहानाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर वडील शाहरुख खानच्या 55व्या बर्थडे दरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्यासोबत वडील शाहरुख खान आणि दोन भाऊ आर्यन आणि अबराम दिसतायेत.  फोटोच्या बॅकग्राऊंडला फेमस बिल्डिंग बुर्ज खलीफा दिसतेय. सुहानाने फोटो पोस्ट करताना लिहिले, तो मला फोटो पोस्ट करुन देणार नाही. पण मला शेअर करायचा होता. 

 सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे.2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या.
 

Web Title: Suhana khan shares picture from shah rukh khan birthday celebrations against brother aryan wish see here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.