सस्ती कॉपी...! सुहाना खानच्या ‘The Archies’चा टीझर पाहून नेटकरी भडकले....पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:52 PM2022-05-19T12:52:57+5:302022-05-19T12:56:59+5:30

The Archies : ‘द आर्चीज’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या 14 मे रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. पण या टीझरनंतर पुन्हा एकदा जुना वाद जिवंत झाला आहे.

suhana khan film the archies teaser gets trolled debate on nepotism | सस्ती कॉपी...! सुहाना खानच्या ‘The Archies’चा टीझर पाहून नेटकरी भडकले....पण का?

सस्ती कॉपी...! सुहाना खानच्या ‘The Archies’चा टीझर पाहून नेटकरी भडकले....पण का?

googlenewsNext

झोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा सिनेमा येतोय आणि या चित्रपटातून तीन बॉलिवूड किड्सचा बॉलिवूड डेब्यू होतोय. होय, शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. बोनी कपूर व श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) हिचाही या चित्रपटातून डेब्यू होतोय. शिवाय अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda ) हा सुद्धा या चित्रपटाद्वारे अभिनयाची कारर्किद सुरू करणार आहे. एकंदर काय, तर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या 14 मे रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. पण या टीझरनंतर पुन्हा एकदा जुना वाद जिवंत झाला आहे. होय, सोशल मीडियावर नव्यानं नेपोटिज्मचा अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा तापला आहे. ट्विटरवर ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंड करतोय.

काहींना ‘द आर्चीज’चा टीझर आवडला आहे. पण काहींनी तो पाहून बॉलिवूडला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. काहींनी हा चित्रपट हॉलिवूडची कॉपी असल्याचं म्हणत या चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्सची कॉपी. काही तर ओरिजनल करा,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘सस्ता हॉलिवूड... कौवा चला हंस की चाल,’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. ‘म्हणून बॉलिवूडची लोकप्रियता कमी होतेय. नेहमी स्टारकिड्सलाच पुढे दामटा,’अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. नेपोटिज्म शिखरावर, असं लिहित एकाने टीका केली आहे.

काय आहे चित्रपटाची कथा
‘द आर्चीज’ हे लोकप्रिय कॉमिक्स आहे. या कॉमिक्समधील पात्रांना पडद्यावर उभं केलं जाणार आहे. यासाठी 1960 च्या काळातील चित्र उभं केलं जाणार आहे. झोया अख्तर ही या चित्रपटाची दिग्दर्शक आहे. या चित्रपटात सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत आहे. खुशी कपूर बेट्टीच्या तर अगस्त्य नंदा आर्चिजच्या टायटल रोलमध्ये दिसणार आहे. याशिवाय मिहिर आहुजा, डॉट, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही भूमिका आहेत. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
 

Web Title: suhana khan film the archies teaser gets trolled debate on nepotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.