VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:36 PM2018-10-02T12:36:22+5:302018-10-02T12:43:53+5:30

सिनेमात झळकण्याआधीच अनन्या तरूणांच्या दिलों की धडकन बनताना दिसते. होय, ती जिथे जाते तिथे लोक तिला ओळखू लागले आहेत. 

Student of the year 2 Actress Ananya Pandeys Latest video with her fan is going viral | VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’

VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’

googlenewsNext

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, आर्यन खान असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. त्यामुळे सिनेमात झळकण्याआधीच अनन्या तरूणांच्या दिलों की धडकन बनताना दिसते. होय, ती जिथे जाते तिथे लोक तिला ओळखू लागले आहेत. 

त्यामुळे तिला पाहाताच तिच्या बरोबर फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. ती ही कोणाला नाराज न करता चाहत्यांसह फोटो काढण्याचा आनंद लुटताना दिसते. नुकताच अनन्याचा एक व्हीडीओ समोर आले आहे. यात तिला पाहताच तिचा एक चाहता तिच्यासह फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यावेळी अनन्या त्या चाहत्यासह फोटो काढते आणि फोटो काढून झाल्यानंतर चाहता तिला बोलतो की, ‘मैडम मैं भी पांडे हुँ ...’ हे ऐकताच अनन्या त्याला हसत बाय बोलून गाडीत बसते. 

येत्या काळात अनन्याचा ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ हा चित्रपट रिलीज होतोय. सध्या अनन्या या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या सेटवर अनन्या थोडक्यात बचावल्याची खबर आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडे ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’च्या सेटवर एक गंभीर अपघात घडला. या अपघातातून अनन्या केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावली. त्याचे झाले असे की, एका सीनमध्ये अनन्याला ड्राईव्ह करताना सीन पूर्ण करायचा होता. पण अचानक अनन्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि तिची गाडी एका झाडावर जावून आदळली. या अपघातानंतर सगळ्यांचेच धाबे दणाणले. सगळेच गाडीकडे धावले. सुदैवाने अनन्याला यात कुठलीही दुखापत झाली नाही. अनन्या उत्तम ड्राईव्हिंग करते़ अशात तिचे गाडीवरचे नियंत्रण कसे सुटले, याचा विचार करून सेटवर उपस्थित लोक हैरान होते. दरम्यान या अपघातानंतर सेटवर कुठलाही अपघात होणार नाही, यासाठी एक स्पेशल युनिट टीम तैनात करण्यात आली आहे.

Web Title: Student of the year 2 Actress Ananya Pandeys Latest video with her fan is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.