90 च्या दशकातली  अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या ग्लॅमर इंडस्ट्रीपासून लांब असली तरी पुरस्कार सोहळे आणि एव्हेंट्समध्ये ती आवर्जुन हजेरी लावताना दिसते. करिश्मा आपल्या चाहत्यांसह कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियाचा अगदी योग्य रितीने वापर करताना दिसते. तिच्या प्रत्येक घडामोडी ती सोशल मीडियावर अपडेट करताना दिसते. नुकतेच करिश्माने एक फोटो शेअर केला आहे. करिश्माने शेअर केलेला फोटोत तिचा मोनोक्रोम लूक पाहायवला मिळतोय.

ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन असलेला हा ड्रेस तिने परिधआन केला आहे. अमित अग्रवालने तिचा हा ड्रेस डिझाइन केला आहे. करिश्माचा हा मोनोक्रोम लूक सा-यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच बरोबर तिचा हा ग्लॅमरस लूक पाहताच तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये कधी झळकणार असे चाहते प्रश्न विचारताना दिसतायेत. त्यामुळे आगामी काळात ती कोणत्या सिनेमात झळकल्यास आश्चर्य वाटायला नको.

एक काळ असा होता की, कपूर घराण्याशी संबंध असूनही करिश्मालाही बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले. ज्यावेळी करिश्माने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी तिच्या लूकमुळे तिला कोणी संधी देत नव्हतं. तिला लेडी रणधीर म्हणून ओळखले जायचे. तर कधी ती मुलासारखी दिसते अशी तिची खिल्ली उडवली जायची. हिरोइन मटेरिअल नसल्याचे तिला बोलले जायचे. 

मात्र 'राजा हिंदुस्तानी' हा सिनेमा तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलेच नाही. एक से बढकर एक संधी तिला मिळत गेल्या.बॉलिवूडमध्ये अनेक ऑफर्स मिळण्याला कारणीभूत ठरला तो तिचा मेकओव्हर. 'राजा हिंदुस्तानी' सिनेमात तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यांनेही तिने रसिकांवर जादू केली होती. आजही 'राजा हिंदुस्तानी' सिनेमा आठवताच करिश्मा कपूर नजरेसमोर येते. त्यामुळे मेकओव्हर केल्यानं कुणाचंही नशीब क्षणात कसे पालटू शकतं हे करिश्माने त्यावेळी सिद्ध केले होते.  


Web Title: In a strapless monochrome gown, retro hairdo and diamond neckpiece, Karisma Kapoor looks like a goddess
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.