बॉलिवूड निर्माते जयंतीलाल गडा यांच्या मुलाचे नुकतेच ग्रँड रिसेप्शन मुंबईत पार पडले. यावेळी बॉलिवूडमधील सा-याच सेलिब्रेंटीनी या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. या सा-या सेलिब्रेटींमध्ये एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ आहे अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि बोनी कपूर यांचा. व्हिडीओत दोघेही मीडियाच्या कॅमे-यांना पोज देत असल्याचे पाहायला मिळतंय. त्यात्यातच आणखीन थोडे बारकाईने बघितल्यास तुमच्या लक्षात येईल की, बोनी कपूर उर्वशीच्या बंपवर हात मारताना दिसतायेत.

यावेळी उर्वशी रौतेलालाही थोडी ऑक्वर्ड झाल्याचे तिच्या चेह-याचे हावभाव पाहून  स्पष्ट दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून ब-याच जणांनी बोनी कपूर यांना टार्गेट केले आहे. युजर्सने कमेंट करत बोनी कपूर विरोधात अनेक प्रतिक्रीया दिल्या आहेत. बोनी कपूर यांचे असे वागणे हे नक्कीच शोभनीय नाही. त्यांच्या विरोधात कमेंट करत आपला राग व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे.  

तसेच बोनी कपूर श्रीदेवीच्या जीवनावर एक डॉक्यूमेंट्री करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या बोनी कपूर हे या डॉक्यूमेंट्रीच्या तयारीला पूर्ण वेळ देत आहेत. या डॉक्यूमेंट्रीसाठी बोनी कपूर यांनी श्री', 'श्रीदेवी' आणि 'श्रीदेवी मॅम' हे तीन टायटल रजिस्टर सुद्धा केले आहेत. श्रीदेवी यांनी काम केलेल्या सिनेमांचे टायटलही बोनी कपूर यांनी रजिस्टर केले आहेत. त्यांनी एकूण 20 टायटल्स रजिस्टर केले आहेत. बोनी कपूर हे या डॉक्यूमेंट्रीमध्ये सगळेच रिअल फुटेज वापरणार आहेत. त्यामुळे श्रीदेवीचं जगणं आणखीन वेगळ्याप्रकारे सर्वांसमोर येणार आहे.

Web Title: Sridevi's Husband Boney Kapoor Gets Cozy With Urvashi Rautela Publicly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.