नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम बघून इम्प्रेस झाला पेटाचा दिग्दर्शक, नवाजबाबत केले 'हे' मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:01 AM2019-01-10T11:01:50+5:302019-01-10T11:09:30+5:30

ऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाची वाट रजनीकांत यांचे चाहते कधी पासून बघत होते.

South indian director impress by navajuddin siddique , give this statement | नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम बघून इम्प्रेस झाला पेटाचा दिग्दर्शक, नवाजबाबत केले 'हे' मोठे वक्तव्य

नवाजुद्दीन सिद्दीकीचे काम बघून इम्प्रेस झाला पेटाचा दिग्दर्शक, नवाजबाबत केले 'हे' मोठे वक्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू करतोयनवाज यात व्हिलनची भूमिका साकारतोय

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाची वाट रजनीकांत यांचे चाहते कधी पासून बघत होते. रजनीकांत यांच्यासह यात विजय सेथुपत्ती, त्रिशा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बॉबी सिम्हा यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू करतोय. नवाज यात व्हिलनची भूमिका साकारतोय. या सिनेमामधील नवाजची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नवाजदेखील आपल्या भूमिकेला घेऊन खूपच उत्सुक होता.


रजनीकांत यांचे फॅन पेटाचे दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, त्यांना नवाजुद्दीनच्या काम करण्याची पद्धत आणि व्हर्सटायलिटी आवडली. मी त्याचा फॅन झालो, माझ्या मताप्रमाणे नवाज साऊथ इंडियन लोकांसारखचा दिसतो. मला विश्वास आहे तो साऊथच्या सिनेमांमध्ये भूमिका साकारु शकतो. 


पेटामध्ये  थलायवा एक गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार आहेत. पेटा तुम्हाला 1980 ते 90 च्या दशकाची आठवण देणार आहे. अॅक्शन आणि लव्हस्टोरी असा कॉम्बो या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पेटा'चा दिग्दर्शक कार्तिक आणि अभिनेता विजयसोबत हा त्यांचा दुसरा प्रोजेक्ट आहे. याआधी दोघांसोबत 'पिज्जा'मध्ये एकत्र काम केले आहे.सिनेमाचे शूटिंग उत्तराखंडमध्ये झाले आहे. अभिनेत्री सिमरन बग्गासोबत रजनीकांत यांची रोमाँटिक केमिस्ट्री दिसतेय. 

Web Title: South indian director impress by navajuddin siddique , give this statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.