रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत 11 फेब्रुवारीला बिजनेसमॅन आणि अभिनेता विशगन वांगामुडीसोबत लग्नबंधनात अडकली. तिच्या लग्नाला आता तीन महिने झाले असून तिने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. त्यात तिने तिच्या लग्नावेळचा एक मजेशीर किस्सा शेअर केला. तिने सांगितले की, लग्नाच्या विधी दरम्यान खूप नर्व्हस होते.

 

 

कारण त्यावेळी माझा मुलगा वेद माझ्या जवळ नव्हता. नवरा विशगनला सौंदर्याचे नर्व्हस असल्याचे कारण कळताच त्यानेही जोपर्यंद वेद लग्नमंडपात येत नाही तोपर्यंत लग्न करणार नसल्याचा हट्टच धरला.

कारण मला आणि विशगनला आमच्या मुलाने सर्वकाही पाहावे अशी इच्छा होती. त्यानुसार वेद लग्नंडपात आल्यानंतर आमचे लग्न लागले. विशेष म्हणजे विशगनने वेदकडून माझ्याशी लग्न करण्याची परमिशनदेखील घेतली होती.' दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डिंगही आहे. दोघांचे नाते बघून मला खूप आनंद होतो.  

२०१० मध्ये सौंदयाने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत लग्न केले होते. सप्टेंबर २०१० रोजी सौंदर्या व अश्विन दोघेंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नापूर्वी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. २०१६ मध्ये सौंदर्या व अश्विन त्यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. अखेर दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी माझ्या पतीपासून विभक्त झालेय, असे यानंतर सौंदयार्ने टिष्ट्वटरवरून जाहिर केले होते.

सौंदर्याचे हे दुसरे लग्न आहे. सौंदर्या ही दक्षिणेतील एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. विशगन हा सुद्धा घटस्फोटित आहेत. मॅगझिन एडिटर कनिका कुमारनसोबत त्याचे पहिले लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. विशगन हा एका औषध कंपनीचा मालक आहे. याशिवाय अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे. वंजगर उलगम या तामिळ चित्रपटात तो सहाय्यक अभिनेता म्हणून दिसला होता. हा त्याचा डेब्यू सिनेमा होता.

Web Title: Soundarya Rajinikanth Reveals About A Tense Moment During Her Wedding With Vishagan Vanangamudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.