सूरज पांचोली 'सॅटेलाइट शंकर'चे शोज ठेवणार जवानांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 06:00 AM2019-03-25T06:00:00+5:302019-03-25T06:00:00+5:30

अभिनेता सूरज पांचोली तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतो आहे. तो लवकरच 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात झळकणार आहे.

Sooraj Pancholi plans to screen Satellite Shankar for the army jawaans | सूरज पांचोली 'सॅटेलाइट शंकर'चे शोज ठेवणार जवानांसाठी

सूरज पांचोली 'सॅटेलाइट शंकर'चे शोज ठेवणार जवानांसाठी

googlenewsNext

अभिनेता सूरज पांचोली तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतो आहे. २०१५ साली 'हिरो' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज लवकरच 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात झळकणार आहे. 

 पुलवामा येथे दहशतवादांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर सूरज पांचोलीला भारतातील जवानांसाठी काहीतरी करायचे होते. त्यामुळे त्याने 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटातून मिळणारी कमाई जवानांना देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्याने हा चित्रपट जवानांना दाखवायचे देखील ठरवले आहे. 


'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात सूरज जवानाची भूमिका साकारीत असून सहा महिन्यांपूर्वी त्याने या चित्रपटाचे हिमाचल प्रदेशमधील चिटकुल येथील आर्मी कॅम्पमध्ये चित्रीकरण केले. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आर्मी कॅम्पचा सेट उभारला होता आणि तिथल्या जवानांना कोणताही त्रास न देता चित्रीकरण पूर्ण केले. या अनुभवाबाबत सूरज म्हणाला की,'आपण जवानांमुळे इथे सुरक्षित राहत आहोत. ते सीमेवर आपली रक्षा करण्यासाठी सदेैव तत्पर असतात. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. कित्येक दिवस ते आपल्या कुटुंबियांना भेटत नाहीत. मला आठवते आहे की चिटकुलमध्ये पहिल्या शेड्युलचे चित्रीकरण जवानांच्या कॅम्पपासून काही अंतरावर सेट उभारण्यात आला होता. जेव्हा तिथल्या जवानांनी शूटिंग पाहिले तेव्हा त्यांनी खऱ्या जवानांच्या कॅम्पमध्ये आमचे स्वागत केले होते. तिथे दुपारचे जेवण व नाश्ता दिला होता. आम्ही त्यावेळी त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. त्यांच्या कथा ऐकून खूप काही शिकायला मिळाले.'

इरफान कमल दिग्दर्शित 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात सूरजसोबत मेघा आकाश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Sooraj Pancholi plans to screen Satellite Shankar for the army jawaans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.