​सोनू सूद सांगतोय बॉलिवूडमध्ये टिकणे सोपे नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 11:39 AM2017-01-28T11:39:23+5:302017-01-28T17:09:23+5:30

सोनू सूदने दाक्षिणात्य सिनेमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. चार-पाच दाक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला. त्याने शहीद ए आझम ...

Sonu Sood is not easy to live in Bollywood | ​सोनू सूद सांगतोय बॉलिवूडमध्ये टिकणे सोपे नाही

​सोनू सूद सांगतोय बॉलिवूडमध्ये टिकणे सोपे नाही

googlenewsNext
नू सूदने दाक्षिणात्य सिनेमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. चार-पाच दाक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला. त्याने शहीद ए आझम या चित्रपटात भगत सिंगची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने अनके दाक्षिणात्य, पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. युवा, जोधा अकबर यांसारख्या चित्रपटात साकारलेल्या भूमिकांमुळे तो खरा प्रकाशझोतात आला. दबंग या चित्रपटातील छेदी सिंग या भूमिकेने तर त्याला प्रसिद्धीच्या उंचीवर नेऊन ठेवले. आज बॉलिवूडमधील महत्त्वाच्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जात आहे. आता तर हॉलिवूड अॅक्शन स्टार जॅकी चैनसोबत त्याने कूंग फू योगा या चित्रपटात काम केले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील सोनू आणि जॅकी चैन सतत एकत्र दिसत आहेत. सोनूच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. 
आज सोनूला बॉलिवूडमध्ये येऊन जवळजवळ पंधरा वर्षं झाली आहेत. बॉलिवूडमध्ये टिकणे खूपच कठीण असल्याचे त्याचे म्हणणे आहे. सोनूच्या कुटुंबातील कोणीच या इंडस्ट्रीतील नाहीये. ज्यावेळी या इंडस्ट्रीत तुमचा कोणीही गॉडफादर नसतो, त्यावेळी तुम्हाला चांगल्या भूमिका आणि चांगले चित्रपट मिळणे खूप कठीण असते. तुम्ही या इंडस्ट्रीत ज्यावेळी कोणालाच ओळखत नसता, त्यावेळी शारीरिक आणि मानसिक दृष्टीने इंडस्ट्रीत टिकणे खूप कठीण असते असेही सोनू सांगतो. तुम्हाला चित्रपटात ज्यावेळी घेतले जाते. त्यावेळी एखाद्या समुद्रात तुम्ही आहात अशी तुमची अवस्था होते. कारण तिथे अनेकजण तुमच्या आधीपासूनच असतात. त्यामुळे या सगळ्यात तुम्ही किती वेळ श्वास रोकून धरू शकता हे महत्त्वाचे असते. 



Web Title: Sonu Sood is not easy to live in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.