कोरोना काळात ‘देवदूत’ ठरलेल्या सोनू सूदने हात जोडून मागितली माफी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 06:42 PM2021-04-28T18:42:52+5:302021-04-28T18:43:55+5:30

 गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आली आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देवदूतासारखा स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी धावला. आता त्सूनामी बनून आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेतही सोनू सूद रात्रंदिवस लोकांना मदत करतोय.

sonu sood getting hundred messages within a second actor apologizes to his fans as for delay | कोरोना काळात ‘देवदूत’ ठरलेल्या सोनू सूदने हात जोडून मागितली माफी, पण का?

कोरोना काळात ‘देवदूत’ ठरलेल्या सोनू सूदने हात जोडून मागितली माफी, पण का?

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. पण स्वत: कोरोना पॉझिटीव्ह असूनही त्याची मदत थांबली नव्हती.

 गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आली आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देवदूतासारखा स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी धावला. दिवसरात्र खपत त्याने हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवले. कोरोनाची पहिली लाट ओसरली. पण सोनू सूदच्या मदतीचा ओघ आटला नाहीच. जमेल त्या मार्गाने तो लोकांची मदत करत राहिला आणि सोनू लोकांसाठी ‘देव’ ठरला. आता त्सूनामी बनून आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेतही सोनू सूद रात्रंदिवस लोकांना मदत करतोय. पण हे करत असताना त्याने लोकांची क्षमायाचनाही केली आहे.
होय, कोरोना रूग्णांची, त्यांच्या नातेवाइकांची मदत करणा-या सोनूने चाहत्यांची मदत मागितली आहे. सोनूने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो हात जोडून माफी मागताना दिसतोय. कारण काय तर काही मानवी, काही तांत्रिक मर्यादा.

होय, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला अंदाज येईल की, सोनू आणि त्याच्या टीमकडे रोज मदत मागणारे हजारो मॅसेज येत आहेत. व्हिडीओत एक फोन दिसतोय आणि या फोनवर प्रत्येक सेकंदाला एक मॅसेज पॉपअप दिसतोय.  या प्रत्येक मॅसेजकडे लक्ष देणे सोनू व त्याच्या टीमला शक्य होत नाहीये. याचमुळे सोनूने माफी मागितली आहे.
आम्ही तुमच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. पण मदतीला विलंब झाला किंवा  तुमचा मॅसेज आमच्याकडून मिस झाल्यास मी माफी मागतो. मला माफ कराल, असे सोनूने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वीच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. पण स्वत: कोरोना पॉझिटीव्ह असूनही त्याची मदत थांबली नव्हती. आता सोनू कोरोनामुक्त झाला आहे आणि पुन्हा एकदा लोकांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. आता त्याने एक पाऊल पुढे टाकत सर्वसामान्यांची मोफत कोरोना चाचणी करून देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही आता आराम करा आणि टेस्टचे माझ्यावर सोपवा, असे लिहित त्याने कोरोना रूग्णांसाठी ही नवी सुविधा सुरु केली आहे.  
 

Web Title: sonu sood getting hundred messages within a second actor apologizes to his fans as for delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.