खलनायक नही नायक हुँ मै ! बस-विमानानंतर आता 1000 मजुरांना रेल्वेने पाठवले त्यांच्या गावी, सोनू सूद दिवसरात्र करतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 02:06 PM2020-06-04T14:06:44+5:302020-06-04T14:09:09+5:30

चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे. सोनू सूदच्या या कामाची दखल सर्वच स्तरातून घेण्यात येत आहे.

Sonu Sood again became the Messiah; first by buses and now sent thousands of migrants home via multiple trains | खलनायक नही नायक हुँ मै ! बस-विमानानंतर आता 1000 मजुरांना रेल्वेने पाठवले त्यांच्या गावी, सोनू सूद दिवसरात्र करतोय काम

खलनायक नही नायक हुँ मै ! बस-विमानानंतर आता 1000 मजुरांना रेल्वेने पाठवले त्यांच्या गावी, सोनू सूद दिवसरात्र करतोय काम

googlenewsNext

अभिनेता सोनू सूद सध्या तो करत असलेल्या मदतकार्यामुळे चांगलाच चर्चेत आलाय. स्थलांतरितांची तो जी मदत करत आहे. त्यामुळे तो आता त्यांचा ‘रिअल हिरो’ बनलाय. हजारो मजुरांना त्यांच्या गावी सुरक्षितरित्या पाठवण्याचे काम अजूनही सुरूच आहे. आता थेट ट्रेनने सोनू सूदने मजुरांना घरी पावण्याचे काम करत आहे. तो केवळ त्यांच्या जाण्याची सोय करत नाही तर स्वतः रेल्वे स्थानकांवर जाऊन पाहणी करतो. मजुरांच्या मदतीसाठी सोनूने दिवस रात्र एक केली आहे. प्रवाशांची ट्रेन मध्यरात्री होती. त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी तर नाही ना या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी सोनू मध्यरात्री दोन वाजता ठाणे रेल्वे स्टेशनवर हजर होता. येथे सोनूने सर्व प्रशावांना मास्क, सेनिटायझर्स आणि खाद्यपदार्थांची पाकिटे दिली. 

ठाणे स्थानकातून उत्तर प्रदेश आणि बिहार येथील मजुरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या. आम्ही या प्रवाशांना सॅनिटायझर, खाद्यपदार्थाची पाकिटं अशा गरजेच्या वस्तूंचे वाटप केले आहे. या संकटकाळी महाराष्ट्र सरकारकडून मिळत असलेली मदत आणि प्रत्येक कार्यात करत असलेल्या पाठिंब्यामुळे आम्ही मनापासून आभार मानतो, असे सोनूने यावेळी सांगितले.

चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे.  सोनू सूदच्या या कामाची दखल सर्वच स्तरातून घेण्यात येत आहे.अगदी गावात पोहोचलेल्या मजुरांपासून ते केंद्रीयमंत्र्यांपर्यंत सर्वचजण सोनूच्या कामाचं कौतुक करत आहेत. कुणी चित्र काढून, कुणी व्हिडिओ बनवून, कुणी कविता लिहून, कुणी गाणं म्हणून सोनुचे आभार मानत आहेत. मात्र, एका चाहत्याने, सोनूच्या माध्यमातून आपल्या गावी पोहोचलेल्या तरुणाने चक्क देवघरातील देव्हाऱ्यात सोनूला स्थान दिलं आहे.

Web Title: Sonu Sood again became the Messiah; first by buses and now sent thousands of migrants home via multiple trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.