ठळक मुद्देबॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टला भेटण्यासाठी मी गेले होते. त्यांनी मला एका भूमिकेबद्दल सांगितले आणि त्या भूमिकेसाठी माझे ऑडिशन देखील घेण्यात आले. मला ऑफर करण्यात आलेली भूमिका ही खूपच चांगली होती.

सोनाली सहगलने प्यार का पंचनामा या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. सोनाली आता जवळजवळ आठ वर्षं झाले या इंडस्ट्रीचा भाग असून तिने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. या इंडस्ट्रीबाबत तिने काही आश्चर्यकारक खुलासे नुकत्याच एका मुलाखतीत केले आहेत. एखाद्या भूमिकेसाठी नायिकेला काय काय करायला सांगितले जाते हे तिने तिच्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

सोनालीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिला एका भूमिकेसाठी चक्क बॉडी सर्जरी करण्यासाठी सांगण्यात आले होते. तिला ही गोष्ट ऐकून आश्चर्याचा धक्का बसला होता. याविषयी सोनाली सांगते, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टला भेटण्यासाठी मी गेले होते. त्यांनी मला एका भूमिकेबद्दल सांगितले आणि त्या भूमिकेसाठी माझे ऑडिशन देखील घेण्यात आले. मला ऑफर करण्यात आलेली भूमिका ही खूपच चांगली होती. इतकी चांगली भूमिका साकारायला मिळत असल्याचा मला प्रचंड आनंद झाला होता. ही भूमिका ऐकल्यावरच या भूमिकेच्या मी प्रेमात पडले होते. त्यामुळे मी ऑडिशनची तयारी खूपच चांगल्याप्रकारे केली होती.

ऑडिशन झाल्यानंतर मला सांगण्यात आले की, या भूमिकेसाठी मला माझ्या शरीरात काही बदल करावे लागतील आणि या भूमिकेसाठी मला बॉडी सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला. पण या गोष्टीसाठी मी तयार नव्हते. त्यामुळे मी यासाठी लगेचच नकार दिला. पण यामुळे तो चित्रपट माझ्या हातून गेला. मला ही भूमिका प्रचंड आवडली होती. त्यामुळे ही भूमिका मला साकारता येणार नाही हे कळल्यावर मी प्रचंड रडले होते. पण मी थोड्याच वेळात स्वतःला समजावले की, मी केले ते योग्य आहे आणि मी घेतलेल्या निर्णयामुळे मला माझा अभिमान आहे. 

सोनालीने प्यार का पंचनामानंतर वेडिंग पुलाव, सोनू के टिटू की स्वीटी, हायजॅक, सेटर्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 


Web Title: Sonnalli Seygall has revealed casting director had advised her to do cosmetic surgery for role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.