आलिया भटची आई सोनी राजदान कित्येक वेळा ट्विटरवर आपले विचार व्यक्त करत असतात आणि आपल्या चित्रपटांच्या आठवणी शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी ट्विटरवर त्यांच्या चित्रपटातील शिदोरीतील एक आठवण शेअर केली आहे.  सोनी राजदान यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितलं की, हा फोटो १९९३ सालचा गुमराह चित्रपटाचा आहे. नवरा महेश भट दिग्दर्शित या चित्रपटाच्या वेळी सोनी राजदान प्रेग्नेंट होत्या. त्यावेळी त्यांच्या पोटात आलिया होती आणि त्यांना त्या प्रेग्नेंट असल्याचं माहित नव्हतं. 

गुमराह चित्रपटात श्रीदेवी आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते आणि अभिनेते अनुपम खेर सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत होते. गुमराह चित्रपटात सोनी राजदान यांनी एका कैदीची भूमिका साकारली होती. यातील एका दृश्यासाठी त्यांना बरेच सिगारेट ओढावे लागले होते.



 

या चित्रपटातील फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी सांगितले की ‘माझ्या सर्वांत आवडत्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आणि यातील माझ्या भूमिकेची त्यावेळी फार प्रशंसा झाली होती. श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी गरोदर होती. आलिया पोटात असताना एका सीनसाठी मी एकामागोमाग एक बरेच सिगारेट ओढले होते. मी गरोदर असल्याची कल्पना मला तेव्हा नव्हती.


आलिया भटबद्दल सांगायचं तर रणबीर कपूर सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या वृत्तामुळे चर्चेत असते.

आलिया अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

या चित्रपटाशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या इंशाअल्लाह चित्रपटात सलमान खानसोबत झळकणार आहे.

तसंच आलिया बाहुबली फेम दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या आरआरआर चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: soni razdan shares she was pregnant with alia bhatt when she smoked many cigarettes for a scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.