बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या चित्रपटांपेक्षा फॅशन सेन्ससाठी जास्त ओळखली जाते. मग तिचा एअरपोर्टवरील लूक असो किंवा रेड कार्पेटवरील. ती तिच्या हटके आऊटफीटने सर्वांना इंप्रेस करते. त्यामुळे तिला फॅशन क्वीन असे संबोधले जाते. काही दिवसांपूर्वी सोनमचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतील तिच्या लूकने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कारण तिचा ड्रेस खूप छान तर होता पण त्यांची किंमत ऐकून अनेक जण अवाक झाले. सोनमच्या बर्थडे पार्टीमध्ये मलायका अरोरा, जान्हवी कपूर, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, करण जोहर, मसाबा गुप्ता या सारखे कलाकार उपस्थित होते. 

सोनमने बर्थ डे पार्टीत जॅक्युमरचा डीप नेकचा नॉटेड शर्ट आणि एमिला विकस्टिडची मिडी सिल्वर मॅटॅलिकप्लीडेट स्कर्ट घातला होता. यावर लेयर्ड चोकर नेकलेसही तिने घातला होता.

सोनमने परिधान केलेल्या शर्टची किंमत $587 म्हणजे ४० हजार ८०० रुपये आणि मॅटॅलिक स्कर्टची किंमत £711 म्हणजे ६२ हजार रुपये इतकी आहे.

थोडक्यात तिचा संपूर्ण आऊटफिट १ लाख २ हजार ८०० रुपये किंमतीचा आहे.

सोनमच्या आऊटफिटची किंमत ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच एका चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता दलकीर सलमान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Sonam Kapoor's Birthday party dress price was so expensive
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.