सरसंघचालक मोहन भागवतांवर भडकली सोनम कपूर, घटस्फोटावरील त्यांच्या विधानाला म्हटलं मूर्खपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 01:50 PM2020-02-17T13:50:35+5:302020-02-17T13:51:11+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी घटस्फोटावर केलेल्या विधानावर बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर भडकली आहे.

Sonam Kapoor slams Mohan Bhagwat for comments on divorce: Regressive foolish statements | सरसंघचालक मोहन भागवतांवर भडकली सोनम कपूर, घटस्फोटावरील त्यांच्या विधानाला म्हटलं मूर्खपणा

सरसंघचालक मोहन भागवतांवर भडकली सोनम कपूर, घटस्फोटावरील त्यांच्या विधानाला म्हटलं मूर्खपणा

googlenewsNext

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत घटस्फोटावर दिलेल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. मोहन भागवत यांनी सांगितले होते की, साक्षर लोकांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण जास्त पहायला मिळत आहेत. या विधानावर कित्येक लोकांनी मोहन भागवतांवर टीका केली तर काही लोकांनी त्यांच्या विधानांचे समर्थन केले आहे. मोहन भागवतांच्या विधानावर सोनम कपूर भडकली असून सोशल मीडियावर तिने टीका केली आहे.


सोनम कपूरने ट्विटवर मोहन भागवत यांच्या विधानावर टीका केली आहे. सोनमने लिहिले की, कोणता समजूतदार व्यक्ती अशा गोष्टी बोलतो? मागासलेले मुर्खपणाचे हे विधान आहे. सोनम कपूरच्या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सने सोनम कपूरला चुकीचे म्हटलं आहे. 


मोहन भागवत म्हणाले होते की, सध्या समाजात घटस्फोटांची प्रकरण वाढताना दिसत आहे. संपन्न व शिक्षित कुटुंबात घटस्फोटोचे प्रकरण जास्त होत आहेत कारण शिक्षण आणि संपन्नतेमुळे माणूस गर्विष्ठ होतो. त्यामुळे कुटुंबातून तो विभक्त होतो आणि कुटूंब तुटते. भारतात हिंदू समाजात कोणताही पर्याय नाही.


वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सोनम कपूर शेवटची एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत अनिल कपूर व राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते. 

Web Title: Sonam Kapoor slams Mohan Bhagwat for comments on divorce: Regressive foolish statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.