गुटगुटीत गाल, बोलके डोळे फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध नायिका, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 02:36 PM2021-02-13T14:36:07+5:302021-02-13T14:40:02+5:30

सध्या या फोटोनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम आता जेवढी सुंदर तेवढीच ती बालपणीही गोड आणि निरागस दिसायची असं म्हटलं तरीही वागवं ठरणार नाही. बालपणीच्या या फोटोमध्ये सोनम खूपच क्यूट दिसत आहे.

Sonam Kapoor lights up the internet as she drops UNSEEN childhood PIC of a toddler & asks fans to guess | गुटगुटीत गाल, बोलके डोळे फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध नायिका, तुम्ही ओळखलं का?

गुटगुटीत गाल, बोलके डोळे फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध नायिका, तुम्ही ओळखलं का?

googlenewsNext

सेलिब्रिटी आपल्या कलेने म्हणजेच अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळतात. त्यांची प्रत्येक गोष्ट रसिकांना भावते. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात.अशाच अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे बालपण. आपले लाडके कलाकार बालपणी कसे दिसत असतील. ते कसे होते हे जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. बालपणी प्रत्येकजण धम्माल करतो.ही बालपणीची धम्माल मस्ती फोटोत कैद असते. फोटोमधूनच प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून जातो. आजवर आपण ब-याच कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहिले आहेत.

सोनम कपूरनेही तिच्या बालपणाचा हा फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. तिचा हा गोंडस अवतार तुम्हालाही प्रेमात पाडेल. बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच की काय बालपणापासूनच ती चित्रपटसृष्टीशी जोडली गेलेली आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये  चिमुकली सोनम गोड हसताना दिसत आहे. सध्या या फोटोनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम आता जेवढी सुंदर तेवढीच ती बालपणीही गोड आणि निरागस दिसायची असं म्हटलं तरीही वागवं ठरणार नाही. बालपणीच्या या फोटोमध्ये सोनम खूपच क्यूट दिसत आहे.

2018 मध्ये सोनमने आनंदशी लग्न केले. लग्नानंतर माध्यमांशी बोलताना तिने सांगितले होते की,आमचे दोघांचे लग्न फक्त कुटुंबाच्या आनंदासाठी झाले आहे. आनंद आणि मी लग्नापूर्वीपासून एकमेकांना ओळखत होतो आणि एकमेकांना डेटही करत होतो.

मुळात लग्नानंतरही आनंद आणि सोनम एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत. दोघेही आपल्या करियरमध्ये इतके व्यस्त असतात की दोघांनाही एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, "आनंद बर्‍याचदा मुंबईत कामानिमित्त येत असतो, कामाच्या निमित्ताने बहुतेक वेळ तो मुंबईत घालवतो.

रिपोर्टनुसार आनंद आहूजाची वार्षिक कमाई 450 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार 3000 कोटी इतकी आहे. सोनम आणि आनंद एकत्र मिळून वर्षाला सुमारे 3085 कोटी रुपये कमवतात. ज्यामुळे दोघेही बॉलिवूडमधील एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत जोडी मानली जाते.

Web Title: Sonam Kapoor lights up the internet as she drops UNSEEN childhood PIC of a toddler & asks fans to guess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.