फटाके फोडणा-यांवर बरसली सोनम कपूर, म्हटले मूर्ख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 11:31 AM2020-04-06T11:31:04+5:302020-04-06T11:31:43+5:30

काय म्हणाली सोनम...

sonam kapoor lashes out on people who burst crackers on nine pm event through her tweet-ram | फटाके फोडणा-यांवर बरसली सोनम कपूर, म्हटले मूर्ख

फटाके फोडणा-यांवर बरसली सोनम कपूर, म्हटले मूर्ख

googlenewsNext
ठळक मुद्दे वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे 'जोया फॅक्टर' या सिनेमात सोनम दिसली होती.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचे प्रदर्शन घडवण्याचे आवाहन केले होते. देशभरातून त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. अमिताभ बच्चप, आलिया भट, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, कार्तिक आर्यन, अनुष्का शर्मा अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरात दिवा, मेणबत्ती, टॉर्च लावून मोदींना पाठींबा दिला. पण देशातील अनेकांनी मात्र अक्षरश: फटाके फोडत दिवाळी साजरी केली. फटाके फोडणा-या या सर्वांना अभिनेत्री सोनम कपूर हिने चांगलेच सुनावले.

‘देशात सर्वत्र शांतता होती. पण आता पक्षी आणि कुत्र्यांना त्रास होतोय. कारण काही मुर्खांनी आज फटाके फोडण्याचा निर्णय घेतला,’असे ट्विट सोनमने केले.
आता सोनमने ट्विट करावे आणि युजर्स तिला ट्रोल करणार नाही, हे शक्यच नाही. नेहमीप्रमाणे लोकांनी तिला ट्रोल केले. अनेकांनी तिला ‘फस्ट्रेटेड’ म्हटले तर एकाने ‘देश को एकजुट होते देखना तुझे रास नही आ रहा है,’ म्हणत सोनमला ट्रोल केले.

सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत दिल्लीतील आपल्या सासरी आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सोनम व आनंद दोघेही आयसोलेशनमध्ये आहेत. हे कपल नुकतेच लंडनवरून परतले होते. यानंतर दोघांनीही सेल्फ आयसोलेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.  आनंद व सोनम गत 19 मार्चला लंडनवरून भारतात परतले होते.

कोरोनाचा धोका असतानाही सोनम व आनंदने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता.   
 वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे 'जोया फॅक्टर' या सिनेमात सोनम दिसली होती. यानंतर ती सुजॉय घोष यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नांव 'ब्लाइंड' असल्याचे कळतेय.

Web Title: sonam kapoor lashes out on people who burst crackers on nine pm event through her tweet-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.