Box Office : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 11:45 AM2019-02-03T11:45:54+5:302019-02-03T11:46:15+5:30

सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स  ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही.

sonam kapoor anil kapoor film ek ladki ko dekha to aisa laga box office collection | Box Office : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!

Box Office : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!

googlenewsNext
ठळक मुद्देएक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट समलैंगिक नात्यावर आधारित आहे.

सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स  ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ ३ कोटी ३० लाख रूपयांची कमाई केली. म्हणजेच चित्रपटाला फार ओपनिंग मिळू शकले नाही. अर्थात दुस-या दिवशी म्हणजे काल शनिवारी कमाईचा आकडा वाढत ४.६५ कोटींवर पोहोचला. आज रविवारी या कमाईत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.




सुमारे १५०० स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली आहे. एक नवा आणि तितकाच बोल्ड विषय मांडणा-या या चित्रपटाकडून सर्वांनाच अपेक्षा होत्या. पण पहिल्या दिवशीची कमाई बघता, या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. अर्थात डिजिटल व सॅटेलाईटचे हक्क विकून या चित्रपटाने आधीच २४ ते २५ कोटी कमावले आहेत. त्यामुळे ३५ कोटी रूपयांचा बजेट असलेल्या या चित्रपटाला फार नुकसान सोसावे लागेल, याची शक्यता कमी आहे. मेट्रो सिटीत चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण यादरम्यान ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ समोर ‘मणिकर्णिका द क्वीन आॅफ झांसी’ आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या दोन चित्रपटांचे आव्हान आहे.


‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट समलैंगिक नात्यावर आधारित आहे. अनिल कपूरसोनम कपूर या रिअल बाप-लेकीच्या जोडीने या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केले आहे. सोनमने यात स्वीटी नामक मुलीची भूमिका साकारली आहे.

Web Title: sonam kapoor anil kapoor film ek ladki ko dekha to aisa laga box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.