जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टमध्ये दिसणार सोनाक्षी सिन्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2017 06:53 AM2017-03-14T06:53:01+5:302017-03-15T12:42:51+5:30

 जस्टिनच्या या कॉन्सर्टला ‘पर्पज वर्ल्ड टूर’ असे नाव देण्यात आले आहे. सोनाक्षीच्यावतीने जाहिर करण्यात आलेल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले की, ...

Sonakshi Sinha to appear in concert at Justin Bieber? | जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टमध्ये दिसणार सोनाक्षी सिन्हा ?

जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टमध्ये दिसणार सोनाक्षी सिन्हा ?

googlenewsNext
 
स्टिनच्या या कॉन्सर्टला ‘पर्पज वर्ल्ड टूर’ असे नाव देण्यात आले आहे. सोनाक्षीच्यावतीने जाहिर करण्यात आलेल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले की, मी जस्टिन बीबरच्या म्युझिकची जबरदस्त फॅन आहे. काळानुसार त्यानी ज्या पद्धतीने त्याच्या म्युझिकमध्ये इवॉल्व केला आहे, तो मला प्रचंड भावतो. कदाचित त्यामुळेच त्याचे जगभरात फॅन्स असावेत. आता मला या लाइव्ह कॉन्सर्टची प्रतिक्षा आहे. जस्टिन बीबरचे जगभरात लाखो चाहते आहेत. मुंबई येथे होणाºया बीबरच्या या कॉन्सर्टमध्ये सोनाक्षी परफॉर्मन्स करणार असून, तिचा नवा सिंगलही यावेळी रिलिज करणार आहे.

याविषयी या टूरला प्रमोट करीत असलेल्या व्हाइट फॉक्स इंडिया या कंपनीचे संचालक अरुण जैन यांनी सांगितले की, बीबरच्या कॉन्सर्टच्या ओपनिंग अ‍ॅक्टमध्ये आम्ही काही तरी नवे करू इच्छित आहोत, त्यामुळे सोनाक्षीचा सहभाग आमच्यादृष्टीने खूपच महत्त्वपुर्ण आहे. तसेच म्हणाला जस्टिनच्या कॉन्सर्टची ची ओपनिंग ग्रँड आणि आकर्षक कशी होईल यावर माझाभर आहे.
सोनाक्षी सिन्हा शिवाय सनी लिओनी ही या कॉन्सर्टचा भाग बनणार असल्याचे समजतेय. सनीचे फॅन्स भारतासह विदेशातही आहेत. जस्टिन बीबर पर्पज या त्याच्या चौथ्या अल्बमसाठी भारतात येतोय. पर्पज हा त्याचा अल्बम 2015 नोव्हेंबरला रिलीज झालाय. जस्टिनच्या करिअरमध्ये पर्पज हा अल्बम माईल्ड स्टोन ठरला. या अल्बममधील 'वॉट डू यू मीन', 'सॉरी' आणि लव्ह योरसेल्फ ही गाणी हिट ठरली. जस्टिनच्या कॉन्सर्टची तिचे भारतातले चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहतायेत. तर दुसरीकडे सोनाक्षी सिन्हा आपल्या परफॉर्मन्सवर विशेष महेनत घेत असल्याचे समजते आहे. 

Web Title: Sonakshi Sinha to appear in concert at Justin Bieber?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.