ठळक मुद्देमाझ्या आई-वडिलांना वाटते मी एखाद्या सुसंस्कृत, सज्जन मुलाशी लग्न करावे आणि खरे सांगू तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे कोणीच नाहीये. मी काही वर्षांपूर्वी एका स्टार बॉलिवूड सेलिब्रेटीला डेट केले होते. पण याबद्दल कोणालाच कळले नाही.

सोनाक्षी सिन्हाने दबंग या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिने साकारलेली रज्जो ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटातील तिच्या आणि सलमान खानच्या केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा झाली होती. सध्या ती दबंग या चित्रपटाचा तिसरा भाग असलेल्या दबंग ३ या चित्रपटावर काम करत आहे. तसेच तिचा खानदानी शफाखाना हा चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. 

सोनाक्षी सिन्हाने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले असून तिला खूपच कमी वेळात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. सोनाक्षी आपल्या खाजगी आयुष्याविषयी मीडियात बोलणे नेहमीच टाळते. त्यामुळे तिच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती आहे की नाही याबाबत तिच्या फॅन्सना देखील माहीत नाहीये. पण सोनाक्षी एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट करत होती असे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. सोनाक्षीच्या या कबुलीनंतर तिच्या या अफेअरबद्दल कोणालाच कसे काहीही कळले नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

सोनाक्षी सध्या खानदानी शफाखाना या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने आयएनएएसला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या खाजगी आयुष्याविषयी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. एवढेच नव्हे तर तिने कोणाशी लग्न करावे असे तिच्या आई-वडिलांना वाटते याविषयी देखील तिने सांगितले आहे. याविषयी सोनाक्षी सांगते, माझ्या आई-वडिलांना वाटते मी एखाद्या सुसंस्कृत, सज्जन मुलाशी लग्न करावे आणि खरे सांगू तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे कोणीच नाहीये. मी काही वर्षांपूर्वी एका स्टार बॉलिवूड सेलिब्रेटीला डेट केले होते. पण याबद्दल कोणालाच कळले नाही.

सोनाक्षीने या मुलाखतीत स्टार बॉलिवूड सेलिब्रेटी असा उल्लेख केला असला तरी हा अभिनेता कोण आहे याबद्दल तिने बोलणे टाळले आहे. तसेच बंटी सचदेवा आणि सोनाक्षीच्या नात्याची गेल्या काही महिन्यांपासून खूपच चर्चा होती. पण सोनाक्षीने या सगळ्या केवळ अफवा असल्याचे सांगत मी लग्न करेन तेव्हा ही गोष्ट सगळ्यांना नक्कीच सांगेन असे देखील तिने सांगितले. 


Web Title: Sonakshi Sinha Admits To Have Dated A bollywood Celebrity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.