Somy Ali : या माणसाची पूजा करणं बदं करा...; सोमी अलीने पुन्हा एकदा सलमानवर काढली भडास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:41 PM2022-08-19T14:41:43+5:302022-08-19T14:42:10+5:30

Somy Ali, Salman Khan : सोमी अलीनं पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे आणि तिच्या या पोस्टनं सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.

Somy Ali Called Salman Khan A Women Beater Shared Cryptic Posts | Somy Ali : या माणसाची पूजा करणं बदं करा...; सोमी अलीने पुन्हा एकदा सलमानवर काढली भडास!

Somy Ali : या माणसाची पूजा करणं बदं करा...; सोमी अलीने पुन्हा एकदा सलमानवर काढली भडास!

googlenewsNext

एकेकाळी सलमान खान ( Salman Khan) हा सोमी अलीच्या (Somy Ali) प्रेमात वेडा झाला होता. असं म्हणतात की, तिच्यासाठीच त्यानं  संगीता बिजलानीला सोडलं होतं. अर्थात इतकं करूनही सलमान-सोमीचं नातं फार काळ चाललं नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी भारत सोडून गेली ती कायमची. सोमीनंतर सलमानच्या आयुष्यात ऐश्वर्या राय  आली. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही.  सलमानने कथितरित्या ऐश्वर्याला मारहाण केली होती, असं म्हटलं जातं. कदाचित सोमी अलीसोबतही असंच घडलं होतं. सोमी अलीनं पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे आणि तिच्या या पोस्टनं सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.

सोमी अली अनेकदा सलमान खानवर आपली भडास काढली. आता तिने पुन्हा एक पोस्ट केली आहे. या ताज्या पोस्टमध्ये पुन्हा एकदा तिने भाईजानवर महिलांना मारहाण करण्याचा आरोप केला आहे.

सोमीने सलमानच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘महिलांना मारहाण करणार... केवळ मलाच नाही तर अनेकींना... याची पूजा करणं बंद करा प्लीज. हा दुसऱ्यांना त्रास देणारा एक आजारी माणूस आहे. ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीही कल्पना नाही,’ असं या पोस्टरला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे. अर्थात सोमीने कॅप्शनमध्ये सलमानचं नाव घेतलेलं नाही किंवा त्याला पोस्टमध्ये टॅगही केलेलं नाही. पण तिचा इशारा कुणाकडे आहे, हे समजायला लोकांना वेळ लागला नाही.
याआधीही सोमीने सलमानवर असेच अप्रत्यक्ष आरोप केले होते आणि यात तिने ऐश्वर्या रायचं नावही गोवलं होतं.

‘बॉलिवूडच्या हार्वी विन्स्टीन, एक दिवस तुझाही पदार्फाश होईल. ज्या महिलांचं तू शोषण केलंस, त्या एकदिवस समोर येतील आणि सत्य जगाला सांगतील. जसं ऐश्वर्या रायने केलं...,’ असं काही महिन्यांआधी केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं.
 सोमीच्या त्या  पोस्टमध्ये हार्वी विन्सटीनचा उल्लेख आहे. हा हार्वी हॉलिवूडचा मोठा निर्माता व दिग्दर्शक आहे. हार्वीने एक-दोन नाही तर अनेक महिलांसोबतगैरवर्तन केलं. यात हॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींचाही समावेश आहे. बलात्कार, मारहाण, लैंगिक शोषण, धमकी देणे असे अनेक त्याच्यावर आहेत. न्यायालयाने त्याला 23 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

सलमानने ऐश्वयार्ला केली होती हात तुटेपर्यंत मारहाण?
202 साली झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या रायनं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. या पुरस्कार सोहळ्यात पोहोचलेल्या ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झालेली दिसत होती आणि तिने डोळ्यांवर काळ्या रंगाचा मोठा गॉगल घातला होता. ऐश्वर्याला असं पाहूत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. सलमान खानने ऐश्वर्याला मारहाण केली असल्याची चर्चा होती. मात्र ऐश्वर्याने सलमानने  मारहाण केल्याची चर्चा फेटाळत पाय-यांवरुन घसरून पडल्यामुळे हाताला दुखापत झाल्याचा खुलासा केला होता.

Web Title: Somy Ali Called Salman Khan A Women Beater Shared Cryptic Posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.