हनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 07:00 AM2020-09-27T07:00:00+5:302020-09-27T07:00:00+5:30

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक इंटरेस्टिंग किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

Something that happened to Aishwarya and Abhishek on the flight for honeymoon ... | हनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी

हनीमूनसाठी जाताना फ्लाइटमध्ये ऐश्वर्या व अभिषेकसोबत घडले असे काही..., दोघांची उडाली भांबेरी

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. आता अनलॉक झाले असले तरी आधीसारखी परिस्थती अद्याप झालेली नाही. तसेच लोकांमध्येही कोरोनाची दहशत आहे. अशात कलाकारांसोबत अनेक सामान्य लोक घरात कैद आहेत. यादरम्यान बॉलिवूडमधील कलाकारांचे अनेक किस्से ऐकायला व वाचायला मिळत आहेत. तसेच बच्चन कुटुंबाची सून म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एक इंटरेस्टिंग किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 


ही गोष्ट आहे त्यावेळची जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबात सून म्हणून दाखल झाली होती. ऐश्वर्या व अभिषेकने २००७ साली लग्न केले होते. त्या दोघांचं लग्न २० एप्रिलला प्रतीक्षा बंगल्यात विवाह सोहळा पार पडला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोघांना सिनेइंडस्ट्रीतील फेव्हरिट कपल म्हणून पाहिले जाते. लग्नानंतर ऐश्वर्याने एक मुलाखत दिली होती आणि त्या क्षणाबद्दल सांगितले की जेव्हा तिला आता ती विवाहित असल्याची जाणीव झाली होती. तिने यावर तिची व अभिषेकची काय प्रतिक्रिया होती हेदेखील सांगितले.
ऐश्वर्याने सांगितले होते की, आम्ही बोरा बोराच्या आमच्या हनीमून फ्लाइटमध्ये होतो. स्टीवर्डने ऑन बोर्डमध्ये स्वागत करताना म्हटलं वेलकम मिसेस बच्चन. त्यानंतर मी आणि अभिषेकने एकमेकांकडे पाहिले आणि जोराजोरात हसू लागलो. तेव्हा मला जाणीव झाली की मी विवाहित आहे. मी मिसेस बच्चन आहे.


२००० साली पहिल्यांदा अभिषेक आणि ऐश्वर्याने ढाई अक्षर प्रेम के चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजेच २००३ साली त्या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट होता कुछ ना कहो. त्यावेळी ते दोघे फक्त फ्रेंड होते.

२००५ साली पुन्हा एकदा त्यांनी बंटी और बबली सिनेमात काम केले. या चित्रपटातील कजरारे या गाण्यात फक्त ऐश्वर्याने काम केले होते. पण या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ते दोघे एकमेकांना लाइक करू लागले.

त्यानंतर दोघांनी उमराव जान, गुरू आणि धूम २मध्ये एकत्र काम केले. चित्रपटादरम्यान त्या दोघांना बराच वेळ मिळाला आणि त्या दोघांमध्ये प्रेम झाले.

Web Title: Something that happened to Aishwarya and Abhishek on the flight for honeymoon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.