Sohail Khan and Seema Khan divorce: ‘खान’ कुटुंबात आणखी एक घटस्फोट, मलायका व अरबाजनंतर सोहेल आणि सीमा घेणार काडीमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 03:57 PM2022-05-13T15:57:34+5:302022-05-13T15:58:09+5:30

Sohail Khan and Seema Khan Divorce: सोहेल खान व सीमा यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1998 साली दोघांचं लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं.

sohail khan and seema khan file for divorce after 24 years of marriage | Sohail Khan and Seema Khan divorce: ‘खान’ कुटुंबात आणखी एक घटस्फोट, मलायका व अरबाजनंतर सोहेल आणि सीमा घेणार काडीमोड

Sohail Khan and Seema Khan divorce: ‘खान’ कुटुंबात आणखी एक घटस्फोट, मलायका व अरबाजनंतर सोहेल आणि सीमा घेणार काडीमोड

googlenewsNext

Sohail Khan and Seema Khan Divorce:  बॉलिवूड इंडस्ट्रीत नाती बनायला आणि ती तुटायला वेळ लागत नाही. अनेक सेलिब्रिटींचे संसार मोडलेले आपण बघितले आहेत. आता आणखी एक सेलिब्रिटी कपल घटस्फोट घेणार असल्याचं कळतंय. होय, या सेलिब्रिटीची थेट ‘खान’ कुटुंबाशी संबंध असल्यानं या बातमीनं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. काही वर्षांआधी सलमान खान भाऊ अरबाज खान याचा घटस्फोट झाला होता. आता सलमानचा  लहान भाऊ सोहेल खान (Sohail Khan )आणि त्याची पत्नी सीमा ( Seema Khan ) यांचाही घटस्फोट होणार आहे. दोघांचे फॅमिली कोर्टाबाहेरचे फोटो  व्हायरल झाले आहेत.
दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं कळतंय. परस्पर सहमतीने हा घटस्फोट होत असल्याचंही समजतंय.  अर्थात अद्याप सोहेल वा सीमा यांनी घटस्फोटाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

24 वर्षांचा संसार मोडणार!
सोहेल खान व सीमा यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1998 साली दोघांचं लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. चंकी पांडेच्या साखरपुड्यात दोघांची भेट झाली होती. पहिल्याच नजरेत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. धर्म वेगळे असल्यानं या प्रेमात अनेक अडचणी आल्यात. सीमाच्या कुटुंबाला सोहेल व सीमाचं नातं, त्यांचं लग्न मान्य नव्हतं. पण दोघांनीही घरच्यांना न जुमानता लग्न केलं होतं. अगदी अर्ध्या रात्री मौलवींना किडनॅप करून दोघांना निकाह झाला होता. नंतर दोघांनी आर्य मंदिरात लग्न केलं होतं. त्यांना निर्वाण आणि योहन अशी दोन मुलं आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 2017 पासून सोहेल व सीमा वेगवेगळे राहत आहेत. पण आता दोघांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

सीमा ही फॅशन डिझाईनर आहे. ‘बांद्रा 190’ नावाचं तिचं एक फॅशन स्टोरही आहे. सोहेलबद्दल तर तुम्हाला ठाऊक आहेच. सोहेलनं अनेक चित्रपटांत काम केलं आहे. 2002 साली ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर प्यार किया तो डरना क्या, वीर, जय हो, हॅलो, राधे, ट्यूबलाईट अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. सलमान इतकं यश मात्र त्याच्या वाट्याला आलं नाही.

अरबाजनंतर सोहेलचाही घटस्फोट
सोहेलचा मोठा भाऊ अरबाज खान याने 2017 साली मलायका अरोरापासून घटस्फोट घेतला होता. आता अरबाजपाठोपाठ सोहेलचाही संसार मोडला आहे. चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच धक्कादायक आहे.

Web Title: sohail khan and seema khan file for divorce after 24 years of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.