ठळक मुद्दे‘निकम्मा’ हा  एक मसाला चित्रपट असणार आहे. म्हणजे, अ‍ॅक्शन, रोमान्स, इमोशन असे सगळे काही यात पाहायला मिळेल.

यु ट्यूब सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी क्यूट चेह-याची शर्ली सेतिया हिला एक मोठी लॉटरी लागली आहे. यु ट्यूबवरून शर्ली थेट मोठ्या पडद्यावर पोहोचली. होय, ‘निकम्मा’ या आगामी चित्रपटातून शर्लीचा डेब्यू होतोय. या चित्रपटात ती अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक शब्बीर खान दिग्दर्शित करतोय. 


शर्ली ही मुळची न्यूझीलंडची सिंगर आहे. पॉप गाण्यांसाठी ती ओळखली जाते. शर्ली यु ट्यूबवर  लोकप्रिय आहे. यु ट्यूब चॅनलवर तिचे कोट्यवधी सब्सक्राइबर आहेत.


शर्लीला पायजामा पॉपस्टार म्हणूनही ओळखले जाते. याचे कारण म्हणजे, यु ट्यूबवर तिची एन्ट्री पायजाम्यात झाली होती. टी सीरिजच्या एका व्हिडिओ ती पायजामा घालून दिसली होती.

टी-सीरिजने आयोजित केलेल्या एका कॉन्टेस्टमध्ये शर्लीने भाग घेतला आणि ती लोकप्रिय झाली. सोशल मीडिया सेन्सेशन बनण्यापूर्वी शर्ली आरजे होती. रेडिओ तरानावर ‘शो टाईम विद शर्ली’ हा तिचा खास शो प्रसारित व्हायचा.


भारतात जन्मलेली शर्ली लहानपणीच आपल्या कुटुंबासोबत न्युझीलंडला स्थायिक झाली. दोन वर्षांपूर्वीच ती मुंबईत परतली. हीच शर्ली आता हिरोईन बनणार आहे.


 शर्ले आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी खूप उत्सुक आहे. ‘यापेक्षा चांगले पदापर्ण माझ्यासाठी दुसरे असू शकत नाही. एका बाजूने आंतरराष्ट्रीय स्टुडिओ या चित्रपटाशी जोडलेला आहे, तर दुस-या बाजूने मी शब्बीर खान यांच्यासोबत काम करत आहे, असे ती म्हणाली.

‘निकम्मा’ हा  एक मसाला चित्रपट असणार आहे. म्हणजे, अ‍ॅक्शन, रोमान्स, इमोशन असे सगळे काही यात पाहायला मिळेल. चित्रपटाचे फर्स्ट लूकही समोर आले आहे. पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.
  


Web Title: social media sensation shirley setia bollywood debut with Bhagyashree Son Abhimanyu Dassaniin in nikamma
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.