सेलिब्रिटी मंडळी प्रत्येक गोष्टीची अपडेट सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर करतात. काही कलाकार तर खूप अॅक्टीव्ह असतात. सतत काही ना काही फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र कंगणा राणौत या सगळ्या गोष्टीला अपवाद ठरली आहे. कंगणाला सोशल मीडियाचा वापर करणे अजिबात आवडत नाही. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणे म्हणजे आपला वेळ व्यर्थ घालणे असे ती मानते. त्यामुळे तिला इतर सेलिब्रेटींप्रमाणे सोशल मीडियावर आपली कोणतीही माहिती शेअर करायला आवडत नाही. विशेष म्हणजे कलाकार मंडळी सोशल मीडियावर आपली पब्लिसिटी करण्यासाठी मॅनेजर पीआर ठेवतात. मात्र कंगणाने आपले मॅनेजर आणि आपल्या टीमला सोशल मीडियाच्या कामापासून लांबच ठेवले आहे. 


कंगणाला सोशल मीडियाची सगळी माहिती तिची बहिण रंगोली देते. कारण रंगोलीला सतत अॅक्टीव्ह राहायला खूप आवडते. त्यामुळे सोशल मीडियावर कंगणाविषयी चर्चा होत असेल तर त्याची इतंभूत माहिती रंगोली कंगणाला देत असते. इतकेच नाही तर काही लोकं कंगणाच्या सोशल मीडियाचा वापर करत नसल्यामुळे गैर फायदाही घेतात. मात्र या सगळ्या गोष्टींचा कंगणाला जराही फरक पडत नाही. 

कंगणा राणौत म्हणते कबड्डी... कबड्डी... कबड्डी..., नवीन फोटो आला समोर

'मणिकर्णिका - द- क्वीन ऑफ झाँसी' सिनेमानंतर आता कंगणा आणखी एका वेगळ्याच भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. कबड्डीपटूच्या भूमिकेत कंगणा झळकणार आहे. कंगणाचा एक फोटो समोर आला होता. यांत ती कबड्डीचा सराव करत असल्याचे पाहायला मिळाले होते. 'पंगा' असे या सिनेमाचे नाव आहे. अश्विनी अय्यर तिवारी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

खरंतर 'पंगा' सिनेमात कबड्डीचे खूप सीन आहेत. त्यामुळे निर्मात्यांना कंगणा सिनेमातील इतर कलाकार स्क्रीनवर कबड्डी खेळताना नॅचरल वाटेल. त्यामुळे जवळपास दीड महिन्यांपर्यंत या कलाकारांना कबड्डीचे प्रशिक्षण दिले जाणार होते.या कलाकारांना राष्ट्रीय पातळीवरील गौरी वाडेकर, विश्वास मोरे व तारक रोल प्रशिक्षण दिले आहे. कंगणा राणौतदेखील कबड्डी खेळ खूप एन्जॉय करते.


Web Title: So Bracelet is missing from social media, because this is the reason?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.