Smita Patil's Birth Anniversary : अन् स्मिता पाटीलनं केलेली तिच्याच मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:15 AM2021-10-17T11:15:00+5:302021-10-17T11:18:36+5:30

Smita Patil's Birth Anniversary : सहजसुंदर अभिनयानं आणि आपल्या निखळ हास्यानं प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. आज तिची जयंती

Smita Patil Birthday: Smita Patil was decorated like a bride in the last journey | Smita Patil's Birth Anniversary : अन् स्मिता पाटीलनं केलेली तिच्याच मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली!

Smita Patil's Birth Anniversary : अन् स्मिता पाटीलनं केलेली तिच्याच मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली!

googlenewsNext
ठळक मुद्देमृत्यूनंतर आपलं पार्थिव नववधूप्रमाणे सजवलं जावं, अशी स्मिताची इच्छा होती.  मेकअपमॅन दीपक सावंत यांच्याकडे तिनं ही इच्छा बोलून दाखवली होती.

सहजसुंदर अभिनयानं आणि आपल्या निखळ हास्यानं प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील ( Smita Patil). स्मिता पाटील यांची आज जयंती ( Smita Patil's Birth Anniversary). उणंपुरं 31 वर्षांचं आयुष्य आणि 75 चित्रपट असा तिचा प्रवास राहिला. दूरदर्शनची वृत्त निवेदिका ते यशस्वी अभिनेत्री या प्रवासात उत्तम सिनेमे देऊन तिनं चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केलं होतं.

17  ऑक्टोबर 1955 मध्ये पुण्यात स्मिताचा जन्म झाला. निखळ हास्याची देण तिला जन्मताच लाभली होती. पाळण्यातील लेकीच्या चेह-यावरचं लोभस हास्य बघूनच तिच्या आईनं तिचं ‘स्मिता’ हे नामकरण केलं होतं.

स्मिता ही संवेदनशील आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखली गेली. पण पडद्यावर गंभीर दिसणाररी स्मिता ख-या आयुष्यात  कमालीची खोडकर होती.
सिनेमांमध्ये येण्याआधी स्मिता दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिका होती. वृत्तनिवेदिका म्हणून साडी नेसणं बंधनकारक होतं.पण स्मिताला जीन्स आवडायची. मग ती जीन्सवरच साडी नेसायची.

स्मिताचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.  दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिताच्या करिअरचा प्रवास सुरु झाला. पण श्याम बेनेगल यांनी तिच्यातील प्रतिभा हेरली आणि बॉलिवूडच्या एका प्रतिभाशाली अभिनेत्रीचा जन्म झाला. 1972 साली स्मिता टेलिव्हिजनवर दिसली  त्यावेळी ती केवळ   17-18 वर्षांची होती.  1975 मध्ये  श्याम बेनेगल यांनी ‘चरणदास चोर’ या चित्रपटासाठी स्मिताला साईन केलं आणि या चित्रपटाने स्मिताला ख-या अर्थाने स्टार बनवलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 20 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या स्मिताने 75 चित्रपट केलेत. निधनानंतर तिचे 14 चित्रपट रिलीज झालेत.


स्मिताचं खासगी आयुष्य बरंच वादळी राहिलं. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असताना तिला अनेकांचा रोष सहन करावा लागला. कारण राज बब्बर विवाहित होते. त्यांना दोन मुलं होती. विवाहित राज बब्बर स्मिताच्या प्रेमात आकंठ बुडाले. स्मिताही त्यांच्यासोबत राहू लागली. पण खुद्द स्मिताच्या आईला तिचे हे रिलेशन मान्य नव्हते. पण आईचे एक न ऐकता स्मिताने राज यांच्यासोबत विवाह केला. मीडियाने  टीका करण्यास सुरुवात केली. स्मिताला ‘घर फोडणारी महिला’ ठरवण्यात आलं. या टीकेने स्मिता आतून खचली होती. इतकी की, तिच्या संवेदनशील मनावर झालेले घाव परत कधीच भरले गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणारी स्मिता लग्नानंतर अचानक शांत  झाली होती. अनेकदा राज बब्बरशी असलेले लग्न मोडून बाहेर पडण्याचा विचारही तिच्या मनात आला होता. अर्थात स्मिताने असं काही केलं नाही. पण नियतीने मात्र हा विचार नेमका अमलात आणला. 13 डिसेंबर 1986 रोजी राज व स्मिता यांचा मुलगा प्रतिक याचा जन्म झाला. पण प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या सहा तासांत स्मितानं जगाचा निरोप घेतला. राज बब्बर यांच्या आयुष्यातून स्मिताने कायमची एक्झिट घेतली.

कदाचित स्मिताला तिच्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती. आपण वयाच्या 31 व्या वर्षी मरणार आहोत, असं ती पूनम धिल्लोन हिच्याशी बोलता बोलता म्हणाली होती. हा किस्सा स्वत: पूनम यांनीच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

मृत्यूनंतर आपलं पार्थिव नववधूप्रमाणे सजवलं जावं, अशी स्मिताची इच्छा होती.  मेकअपमॅन दीपक सावंत यांच्याकडे तिनं ही इच्छा बोलून दाखवली होती.  निधनानंतर तिच्सं पार्थिव तीन दिवस बर्फात ठेवण्यात आलं होतं. कारण स्मिताची बहीण अमेरिकेत राहत होती.  स्मितावर अत्यंसंस्काराची वेळ आली आणि तिची अखेरची इच्छा पूर्ण केली गेली.  दीपक सावंत यांनी स्मिताच्या पार्थिवाचं नववधूप्रमाणे मेकअप केलं.

दीपक सावंत यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. ‘एकदा कुठल्याशा सिनेमाच्या सेटवर राज कुमार लेटले होते आणि त्यांचा मेकअपमन त्यांचं मेकअप करत होता. स्मिताने हे पाहिलं आणि माझंही असंच मेकअप कर, असं मला  म्हणाली. पण मी तिला नकार दिला. मॅडम, मी असं काहीही करणार नाही. जणू एखाद्या मृतदेहाचं मेकअप करतोय. हे माझ्याकडून होणार नाही, असं मी तिला म्हणालो होतो. पण एक दिवस मीच तिचं तसं मेकअप केलं,’असं दीपक सावंत म्हणाले होतं.

Web Title: Smita Patil Birthday: Smita Patil was decorated like a bride in the last journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.