छोटा पडदा असो की मोठा पडदा, कलाकार हा कायम त्याच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिकच असतो. त्याच्यात कोणतेही व्यंग असले तरीही तो त्याच्यावर मात करून त्याची अभिनयाची कारकीर्द करतच असतो. आता हेच बघा ना, छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता केके गोस्वामी त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे पण खुप चर्चेत असतो. अलीकडेच तो एका वेगळया कारणामुळे चर्चेत आलाय तो म्हणजे त्याच्या लव्हस्टोरीमुळे. त्याची पत्नी पीकू सोबतची त्याची लव्हस्टोरी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. 

४६ वर्षीय असलेल्या केके गोस्वामी याने ‘गुटरगूँ’,‘ विकराल गबराल’ या मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. केके गोस्वामी मुंबईत राहत असून तो त्याची पर्सनल लाईफ आनंदात व्यतित करत आहे. केके आणि त्याची पत्नी पीकू यांच्या लव्हस्टोरीबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा असल्याचं दिसून येतंय. केके याची उंची तीन फूट आहे तर त्याची पत्नी त्याच्यापेक्षा दोन फुटांनी उंच आहे. पीकूची उंची ५ फूट आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही जोडी टीव्ही जगतची प्रसिद्ध जोडी मानली जाते. काही दिवसांपूर्वी पीकूने के केसाठी करवा चौथचे व्रत ठेवले होते. त्याचेही काही फोटो चाहत्यांना पसंतीस उतरले.   

केके आणि पीकू यांनी लव्ह मॅरेज केले होते. केकेने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की,‘जेव्हा मी पीकूला बघायला गेलो तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी केकेला नकार दिला होता. कारण काय तर , केकेची उंची कमी आहे म्हणून नकार देण्यात आला होता. घरच्यांच्या विरोधाला नाकारून पीकू केकेसोबतच लग्न करण्यास इच्छुक होती. पीकूच्या जिद्दीपुढे घरच्यांना झुकावेच लागले. केकेला आता दोन मुले आहेत.      

Web Title: On the small screen, the actor has a wife two feet taller than him; Photo goes viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.