​सुशांत सिंग रजपूतच्या या चित्रपटाद्वारे क्रिती सॅननची बहीण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 07:07 AM2018-01-27T07:07:01+5:302018-01-27T12:37:01+5:30

सुशांत सिंग रजपूत आणि क्रिती सॅननच्या मैत्रीची गेल्या कित्येक महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा आहे. हे दोघे अनेक पार्टींमध्ये, पुरस्कार ...

Sister Santan's sister debut in Bollywood with Sushant Singh Rajput | ​सुशांत सिंग रजपूतच्या या चित्रपटाद्वारे क्रिती सॅननची बहीण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

​सुशांत सिंग रजपूतच्या या चित्रपटाद्वारे क्रिती सॅननची बहीण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

googlenewsNext
शांत सिंग रजपूत आणि क्रिती सॅननच्या मैत्रीची गेल्या कित्येक महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा आहे. हे दोघे अनेक पार्टींमध्ये, पुरस्कार सोहळ्यात एकत्र दिसत असल्याने त्यांच्यात मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक असल्याचे म्हटले जाते. पण या दोघांनी या चर्चांवर मौन राखणेच नेहमी पसंत केले आहे. क्रिती नंतर आता तिची बहीण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. क्रितीच्या बहिणाला बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी क्रितीचा जवळचा मित्र सुशांत सिंग रजपूत प्रयत्न करत आहे. सुशांत सिंग रजपूतच्या बहिणीचे नाव नुपूर असून ती सुशांत सिंग रजपूतसोबत एका चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.
द फॉल्ट इन अवर स्टार हा हॉलिवूडचा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता या चित्रपटाचा रिमेक बॉलिवूडमध्ये लवकरच बनवला जाणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सुशांतसोबत जान्हवी कपूर किंवा आलिया भट्ट झळकणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण आता सुशांतसोबत एका नव्या अभिनेत्रीची वर्णी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रितीची बहीण नुपूरला या चित्रपटात घेण्यासाठी स्वतः सुशांतने या चित्रपटातचे निर्माते, दिग्दर्शक यांना सुचवले आहे आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील नुपूर या भूमिकेसाठी योग्य असल्याचे वाटत आहे. त्यामुळे नुपूरला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. 
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच नुपूर ही चांगलीच फेमस आहे. युट्युबला तिचे अनेक व्हिडिओ असून या व्हिडिओला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ती एक खूप चांगली गायिका असून तिची अनेक गाणी देखील लोकांनी डोक्यावर घेतली आहेत. 
सुशांत सिंग रजपूतच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा करणार आहे. मुकेश हा प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर असून त्यानेच काय पो छे या चित्रपटासाठी सुशांतची निवड केली होती. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ करणार असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. 

Also Read : अंकिता लोखंडेमुळे गमवावा लागला सुशांत सिंग रजपुतला हा अॅवॉर्ड

Web Title: Sister Santan's sister debut in Bollywood with Sushant Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.