ठळक मुद्देलग्न करण्याचा माझ्यावर कोणताही दबाव नाहीये. जेव्हा लग्न व्हायचे असेल तेव्हाच ते होईल... माझा लग्नसंस्थेवर प्रचंड विश्वास असून लव्ह अथवा अरेंज्ड मॅरेज या दोन्ही गोष्टींसाठी मी तयार आहे. 

सिद्धार्थ मल्होत्राने असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने माय नेम इज खान या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. त्यानंतर करण जोहरने स्टुटंड ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे सिद्धार्थला लाँच केले. त्यानंतर त्याने एक व्हिलन, ब्रदर्स, इत्तेफाक यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याचा अभिनय त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडतो. पण त्याचसोबत त्याच्या लूक्सची देखील नेहमीच चर्चा असते. त्याचा जबरिया जोडी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात परिणिती चोप्रा त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन तो सध्या करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थने दिलेल्या मुलाखतीत त्याने लग्न करण्याबाबत त्याचे काय मत आहे याविषयी गप्पा मारल्या आहेत.

सिद्धार्थने डेक्कन क्रोनिकल या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याचा लग्न करण्याचा विचार कधी आहे आणि त्याच्या पालकांनी लग्न करण्यासाठी त्याला एकदा चक्क ब्लॅकमेल केले होते असा खुलासा केला आहे. या मुलाखतीत तो म्हणतो, माझ्या आई वडिलांचा प्रेमविवाह झाला असून त्यांच्या लग्नाला जवळजवळ ४० वर्षं झाले आहेत. ते आजही एकमेकांसोबत प्रचंड खूश आहेत. तसेच माझ्या भावाचे लग्न झाले असून तो त्याच्या पत्नीसोबत खूश आहे. माझे काका-मामा देखील त्यांच्या संसारात सुखी आहेत. 

काही वर्षांपूर्वी लग्न करण्यासाठी माझे पालक मला ब्लॅकमेल करत होते. पण आता ते मला लग्नाबाबत काहीही विचारत नाहीत. लग्न करण्याचा माझ्यावर कोणताही दबाव नाहीये. जेव्हा लग्न व्हायचे असेल तेव्हाच ते होईल... माझा लग्नसंस्थेवर प्रचंड विश्वास असून लव्ह अथवा अरेंज्ड मॅरेज या दोन्ही गोष्टींसाठी मी तयार आहे. 

सिद्धार्थचे आजवर व्यवसायिक आयुष्याइतके वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे. त्याचे आलिया भट, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत आजवर नावं जोडली गेली असून त्याने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवर मौन राखणेच पसंत केले आहे. 

Web Title: Sidharth Malhotra Reveals His Parents Would Blackmail Him To Get Married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.