Siddharth Malhotra's 'Marnaava' shoot was completed, See Photos | सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मरजावां'चे शूटिंग झाले पूर्ण, See Photos
सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मरजावां'चे शूटिंग झाले पूर्ण, See Photos

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट 'मरजावां'चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. ही माहिती खुद्द सिद्धार्थने सोशल मीडियावर दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन झवेरी यांनी केले असून टीसीरिजचे भूषण कुमार, एमाय एण्टरटेन्मेंटचे मोनीश आडवाणी, मधु भोजवानी व निखिल आडवाणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत रितेश देशमुख, तारा सुतारिया व रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

सिद्धार्थने मरजावां चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करीत म्हटले की, मरजावां चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या मजेशीर टीमसोबतचा अनुभव खूप मजेशीर होता. मिलाप झवेरी यांचा मी आभारी आहे. इतक्या कठीण परिश्रमासाठी संपूर्ण क्रुचे खूप आभार. माझे सहकलाकार आणि मस्ती पार्टनर रितेश देशमुख, तारा सुतारिया व रकुल प्रीतला झप्पी आणि खूप सारे प्रेम. 
तर सिद्धार्थच्या ट्विटला दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी उत्तर दिले की, मोठीवाली झप्पी मित्रा. तु तुझे सर्व काही पणाला लावलेस. पूर्ण हिंदी चित्रपटाचा हिरो. माझ्यावर व माझ्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवण्यासाठी मी आभारी आहे. आपण २ ऑक्टोबरला लोकांच्या मनात जागा बनवायची का? 

मरजावां चित्रपटात रितेश नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अॅक्शन व रोमांसने परिपूर्ण असा असणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ व रकुल दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. तर सिद्धार्थ व तारा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. त्यामुळे त्या दोघांना एकत्र पाहणे कमालीचे ठरणार आहे. तारा सुतारिया ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सचे यूकेतून ट्रेनिंग घेतले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.
 


Web Title: Siddharth Malhotra's 'Marnaava' shoot was completed, See Photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.