अभिनेत्री श्वेता तिवारी हे नाव प्रेक्षकांसाठी नवीन राहिलेलं नाही. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची लेक पलकदेखील चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. सोशल मीडियावर तिचे एक से बढकर एक फोटो पाहून नेटीझन्सही तिच्यावर फिदा असल्याचे पाहायला मिळत आहे. आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही ती तितकीच सजग आहे. मुळात बोल्डनेसमध्ये तिने सारा आणि जान्हवीसारख्या इतर स्टारकिड्सनाही मागे टाकले आहे.

तिच्या या फोटोंवर हटे ना हटे नैना ! अशा कमेंटस युजर्स देत असल्याचे पाहायला मिळते आहे.  विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे. 

आता लॉकडाऊनचा पलक तिवारीला खूप जास्त फायदा होतोय. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे पलकचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

अशात पलकचे घायाळ करणारे फोटो पाहण्यात चाहते दंग होतायेत. तिने नुकतेच तिचे बोल्ड फोटोशूट केले आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पलकचहा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे. अनेकदा पलकचे फोटो पाहून तिची आई श्वेता तिवारीच्या फोटोंची तुलना सोशल मीडियावर होताना दिसते. पलक ही श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा तिवारी यांची मुलगी आहे. 
 

Web Title: Shweta Tiwari Daughter Palak Tiwari Shares Bed Selfies People Commenting-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.