​श्रीदेवी यांच्या मृत्युमुळे शबाना आझमी यांनी रद्द केली होळी पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 10:10 AM2018-02-26T10:10:52+5:302018-02-26T15:40:52+5:30

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या घरी दरवर्षी होळी मोठ्या आनंदात साजरी केली जाते. बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी होळीच्या निमित्ताने ...

Shubana Azmi canceled the Holi party due to Sridevi's death | ​श्रीदेवी यांच्या मृत्युमुळे शबाना आझमी यांनी रद्द केली होळी पार्टी

​श्रीदेवी यांच्या मृत्युमुळे शबाना आझमी यांनी रद्द केली होळी पार्टी

googlenewsNext
ाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या घरी दरवर्षी होळी मोठ्या आनंदात साजरी केली जाते. बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी होळीच्या निमित्ताने शबाना आणि जावेद यांच्या घरी येतात. या सेलिब्रिटींमध्ये श्रीदेवी यांचा देखील आवर्जून समावेश असायचा. शबाना आणि श्रीदेवी या गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्याचमुळे आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या निधनानंतर शबाना यांनी आपल्या घरातील यंदाची होळी पार्टी रद्द केली आहे. 
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर शबाना आझमी त्यांचे पती जावेद अख्तर यांच्यासोबत लगेचच अनिल कपूर यांच्या घरी दाखल झाल्या होत्या. शबाना आणि जावेद यांनी अनिलच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. श्रीदेवी यांच्या निधनानंतर शबाना यांनी ट्विटरच्या त्यांच्या अकाऊंटवरून सांगितले आहे की, २ मार्चला माझ्या घरी होणारी होळी पार्टी रद्द करण्यात आली आहे. 
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या घरात होळीची पार्टी असते. श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज यंदाची होळी पार्टी रद्द करणार असल्याची चर्चा आहे. 
अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत मुंबईत आणण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. 1967 साली त्यांचा एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.

Also Read : ​फॉरेन्सिक अहवालानुसार या कारणामुळे झाले श्रीदेवी यांचे निधन

Web Title: Shubana Azmi canceled the Holi party due to Sridevi's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.