ठळक मुद्दे‘बाहुबली2’नंतर प्रभासचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळेही ‘साहो’बद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

‘बाहुबली’ फेम साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हा आगामी चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असे चाहत्यांना झाले आहे. कालच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. इतकी की, प्रभासचे चाहते हा टीजर पाहून अक्षरश: अंगातला शर्ट  भिरकावत नाचायला लागले. प्रभाससाठी खरे तर चाहत्यांचे असे वागणे नवे नाही. पण ‘साहो’मधील प्रभासची को-स्टार श्रद्धा कपूर हे पाहून अवाक् झाली. प्रभासच्या ‘जबरा’ फॅन्सचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत चाहते आनंदाने नाचताना दिसत आहेत.

‘प्रभासचे क्रेजी चाहते. प्रभास, सुजीत आणि ‘साहो’च्या अख्ख्या टीमसोबत काम करणे स्वप्नवत आहे. ‘साहो’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भावूक आहे. थँक्यू साहो,’ असे श्रद्धाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे.


‘साहो’मध्ये प्रभास व श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहेत. आधी या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अनुष्का शेट्टी हिच्या नावाची चर्चा होती. पण अनुष्काच्या वाढलेल्या वजनामुळे तिला हा चित्रपट गमवावा लागला होता. (‘बाहुबली 2’ मध्ये प्रभास व अनुष्काची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती.) 
‘बाहुबली2’नंतर ‘साहो’ या चित्रपटात प्रभास एका आगळ्यावेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. यासाठी त्याने ७ ते ८ किलो वजन घटवले आहे.

सुजीत दिग्दर्शित या चित्रपटात नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘बाहुबली2’नंतर प्रभासचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळेही ‘साहो’बद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. ही उत्सुकता बघता, ‘साहो’च्या मेकर्सनी  ‘शेड्स आॅफ साहो’ व्हिडीओ रिलीज केले होते. ‘शेड्स आॅफ साहो’ हा प्रामुख्याने ‘साहो’चा मेकिंग व्हिडिओ आहे.   


Web Title: shraddha kapoor shocked as prabhas fans gone crazy after watching saaho teaser
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.