shraddha kapoor to play lead role with tiger shroff in baaghi 3 | अखेर ‘बागी 3’ला हिरोईन मिळाली! पुन्हा एकदा टायगर श्रॉफ-श्रद्धा कपूरची जोडी!!
अखेर ‘बागी 3’ला हिरोईन मिळाली! पुन्हा एकदा टायगर श्रॉफ-श्रद्धा कपूरची जोडी!!

ठळक मुद्दे‘बागी 3’ हा चित्रपट पुढील वर्षी ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बागी’ व ‘बागी 2’ या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’ची प्रतीक्षा करणा-या सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अखेर टायगरच्या या सिनेमाला हिरोईन मिळालीय. गेल्या अनेक दिवसांपासून टायगरच्या अपोझिट हिरोईनचा शोध सुरु होता. पण आता एक नाव फायनल झाले आहे. हे नाव आहे, श्रद्धा कपूरचे. होय, ‘बागी 3’चा निर्माता साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक अहमद खान यांनी श्रद्धाच्या नावावर मोहर लावली आहे. ‘बागी’मध्ये श्रद्धा कपूरटायगर श्रॉफ यांची जोडी आॅनस्क्रिन रोमान्स करताना दिसली होती. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. हीच जोडी पुन्हा एकदा ‘बागी 3’मध्ये धूम करणार आहे.


साजिद नाडियाडवालासोबत श्रद्धाचा हा तिसरा सिनेमा असणार आहे. यापूर्वी साजिदसोबत श्रद्धाने ‘बागी’मध्ये काम केले. यानंतर साजिदच्याच ‘छिछोरे’ या चित्रपटातही श्रद्धाची वर्णी लागली. ‘छिछोरे’ सध्या शूटींग फेजमध्ये आहे.  हा चित्रपटही एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. आता ‘बागी 3’ या अ‍ॅक्शनपटासाठीही श्रद्धाच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. तूर्तास ‘बागी’ फे्रंचाइजीमध्ये परतून जाम खूश आहे. ‘बागी’ लोकांना आवडला होता. या चित्रपटाच्या अनेक सुंदर आठवणी आहेत. आता मी साजिदसोबत पुन्हा एकदा काम करणार, याचा आनंद आहे. स्क्रिप्ट शानदार आहे, असे श्रद्धा म्हणाली.


‘बागी 3’ हा चित्रपट पुढील वर्षी ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बागी’ व ‘बागी 2’ या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.  ‘बागी’ हिट झाल्यानंतर याच्या सीक्वलमध्ये टायगरसोबत त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी झळकली होती. टायगर व दिशाचा रोमान्सही हिट झाला होता.

Web Title: shraddha kapoor to play lead role with tiger shroff in baaghi 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.