ठळक मुद्देश्रद्धा आणि रोहन पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असून श्रद्धाची आई म्हणजेच शिवांगी कपूर यांनी त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात देखील केली आहे. 

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा या दोघांच्या अफेअरची गेल्या कित्येक महिन्यांपासून मीडियामध्ये चर्चा सुरू आहे. पण या दोघांनी आपले नाते अजूनही जगापासून लपवून ठेवले आहे. श्रद्धा आणि रोहन दोघेही सुमारे वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. श्रद्धा आणि रोहन एकमेकांचे जुने मित्र. पण सध्या हे नाते मैत्रीपलीकडे गेले आहे. खरे तर आत्तापर्यंत दोघांनीही हे रिलेशनशिप उघड होऊ न देण्याचे आटोकाट प्रयत्न केलेत. पण शेवटी लपवून-लपवून किती लपवणार? काही प्रसंगी अप्रत्यक्ष का होईना, हे प्रेम जगाला दिसतेच. सोशल मीडियावरही या प्रेमाचे काही अप्रत्यक्ष संकेत मिळत असतात.

 

श्रद्धा कपूर आता 2020 मध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत मुंबई मिररने नुकतेच वृत्त दिले आहे. त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, श्रद्धा आणि रोहन पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असून श्रद्धाची आई म्हणजेच शिवांगी कपूर यांनी त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात देखील केली आहे. 

रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जात आहे. 

श्रद्धाच्या लग्नाबाबत तिचे वडील शक्ती कपूर यांना काही दिवसांपूर्वी विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी सांगितले होते की, श्रद्धा चार-पाच वर्षं तरी लग्न करणार नाहीये. सध्या तिच्याकडे खूप सारे प्रोजेक्ट असल्याने ती त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. आणि सध्या तर ती कामात प्रचंड व्यग्र असून दोन वर्षं तरी तिला कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नाहीये. 

आता श्रद्धा 2020 मध्ये खरंच लग्न करतेय की नाही हे आपल्याला केवळ तीच सांगू शकेल. पण अद्याप तरी तिने यावर मौन राखणेच पसंत केले आहे. 

Web Title: Shraddha Kapoor to marry Rohan Shreshtha in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.