श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या नात्याला हनी इराणीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 03:12 PM2017-01-20T15:12:20+5:302017-01-20T15:12:20+5:30

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. ते दोघे लिव्ह इन ...

Shraddha Kapoor and Farhan Akhtar's relationship with Honey Irani | श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या नात्याला हनी इराणीचा विरोध

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या नात्याला हनी इराणीचा विरोध

googlenewsNext
ref="http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/shraddha-kapoor-opens-up-about-living-in-with-farhan-akhtar/16037">श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्य राहात असल्याचेही म्हटले जात होते. तसेच त्यांच्या नात्याला श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनीदेखील विरोध केल्याच्या बातम्यादेखील येत होत्या. पण दोघांनीही अद्याप या चर्चांवर मौन राखणेच पसंत केले आहे. 
श्रद्धा आणि फरहानच्या नात्याला फरहानच्या घरातूनच विरोध असल्याचे म्हटले जात आहे. फरहानची आई अभिनेत्री हनी इराणी यांना हे नाते पसंत नसल्याची चर्चा आहे. फरहानने गेल्या वर्षी त्याची पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतला. फरहानने अधुनाला घटस्फोट देणे हे हनी यांना पटले नव्हते. अधुना आणि फरहान यांना दोन मुली आहेत. तसेच हनी यांचे अधुनासोबत खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या सूनेला घटस्फोट दिल्यामुळे त्या फरहानवर नाराज आहे. तसेच श्रद्धा फरहानच्या नात्याबद्दल हनी यांच्या कानावर गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक गोष्टी येत आहेत. श्रद्धाचे फरहानच्या आयुष्यात असणे तिला पसंत नसल्याचे म्हटले जात आहे. यामुळेच श्रद्धा फरहानच्या कुटुंबियांपासून दूर राहात आहे.
प्रसिद्ध गीतकार आणि फरहानचे वडील जावेद अख्तर यांचा नुकताच वाढदिवस झाला होता. हा वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या थाटात साजरा केला. बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थिती लावली होती. पण श्रद्धा मुंबईत असूनदेखील तिने या वाढदिवसाच्या पार्टीपासून दूर राहाणेच पसंत केले होते. त्याचे कारण हनी इराणीच असल्याचे म्हटले जात आहे. हनी इराणींना श्रद्धा आवडत नसल्याने तिने या पार्टीला न जाणेच पसंत केले अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.  

Web Title: Shraddha Kapoor and Farhan Akhtar's relationship with Honey Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.