शो मस्ट गो ऑन..! आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झालेली असतानाही 'लाल सिंग चड्ढा'चे केले शूटिंग

By तेजल गावडे | Published: October 19, 2020 02:54 PM2020-10-19T14:54:17+5:302020-10-19T14:54:56+5:30

अभिनेता आमिर खान सध्या त्याचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट लाल सिंग चड्ढाचे दिल्लीत शूटिंग करतो आहे.

The show must go on ..! Shooting of 'Lal Singh Chadha' despite Aamir Khan's ribs being injured | शो मस्ट गो ऑन..! आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झालेली असतानाही 'लाल सिंग चड्ढा'चे केले शूटिंग

शो मस्ट गो ऑन..! आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झालेली असतानाही 'लाल सिंग चड्ढा'चे केले शूटिंग

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान सध्या त्याचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट लाल सिंग चड्ढाचे दिल्लीत शूटिंग करतो आहे. काही दिवसांपूर्वी करीना कपूरने सोशल मीडियावर घोषणा केली होती की तिने लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यात असं समजते आहे की आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झालेली असतानाही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.


लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या सेटवर उपस्थित असलेल्या एका सूत्रांनी सांगितले की, काही अॅक्शन दृश्यांच्या शूटिंगदरम्यान आमिर खानच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. मात्र यामुळे शूटिंगमध्ये कोणतीच अडसर आली नाही. आमिर खानने काही कालावधीतच औषधांच्या मदतीने पुन्हा शूटिंगला सुरूवात केली आहे.


आमिर खानच्या मेहनतीचे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतूक करू तेवढे कमीच आहे. एक्शन दृश्यांच्या शूटिंगदरम्यान दुखापत झालेली असतानाही त्याने शूटिंग केले. त्याच्यामुळे काम अडू नये म्हणून त्याने औषधांसोबत आपली दुखापत बरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. 


लाल सिंग चड्ढा चित्रपटाची टीम शूटिंगदरम्यान आवश्यक ती काळजी घेत आहेत. हा चित्रपट टॉम हँक्सचा फॉरेस्ट गम्पपासून प्रेरीत होऊन बनवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


 'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. आधी हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. २०२१ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: The show must go on ..! Shooting of 'Lal Singh Chadha' despite Aamir Khan's ribs being injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.