​सात महिन्याची गरोदर असताना जुही चावलाने या चित्रपटासाठी केले होते चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 11:12 AM2017-10-18T11:12:39+5:302017-10-18T16:42:39+5:30

जुही चावलाने सुलतनत या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. जुही अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी मिस इंडिया होती. पहिल्या चित्रपटापासूनच तिच्या भूमिकेचे ...

Shooting was done for Juhi Chawla when she was seven months pregnant | ​सात महिन्याची गरोदर असताना जुही चावलाने या चित्रपटासाठी केले होते चित्रीकरण

​सात महिन्याची गरोदर असताना जुही चावलाने या चित्रपटासाठी केले होते चित्रीकरण

googlenewsNext
ही चावलाने सुलतनत या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. जुही अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी मिस इंडिया होती. पहिल्या चित्रपटापासूनच तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. पण कयामत से कयामत तक या तिच्या चित्रपटामुळे तिला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटातील तिची आणि आमिरची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटानंतर तिला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. हम है राही प्यार के, बोल राधा बोल, राजू बन गया जंटलमन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. जुहीने १९९५ मध्ये जय मेहता सोबत लग्न केले. जय मेहता हे प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. लग्न केल्यानंतर अनेक अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासूनद दूर पळतात. पण जुहीने चित्रपटात काम करणे कधीच सोडले नाही. तुम्हाला माहीत आहे का जुहीने तिच्या दोन्ही गरोदरपणात देखील काम केले आहे. ती कधीच चित्रपट सृष्टीपासून दूर गेली नाही. पहिल्या बाळाच्या वेळी गरोदर असताना तिने आमदनी अठ्ठणी खर्चा रूपय्या या चित्रपटासाठी चित्रीकरण केले होते तर तिच्या दुसऱ्या बाळाच्या वेळी गरोदर असताना तर ती सातव्या महिन्यापर्यंत चित्रीकरण करत होती.
झंकार बीट्स या चित्रपटातील जुहीची भूमिका आणि या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच जुहीला दिवस गेले होते. तिने त्या अवस्थेतही आराम न करता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. झंकार बीट्स हा चित्रपट पाहाताना ही गोष्ट कधी आपल्या लक्षात देखील येत नाही.
जुही सध्या चित्रपटात काम करत असली तरी ती तिच्या भूमिकांच्या बाबतीत खूपच चुझी झाली आहे. ती खूपच चोखंदळपणे भूमिका निवडत आहे. ती प्रेक्षकांना खूप वेगळ्या पण चांगल्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. गुलाब गँग या चित्रपटात ती प्रेक्षकांना नकारात्मक भूमिकेत दिसली होती. या तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. 

Also Read : जुही चावलाने शाहरूख खानला बघताच म्हटले होते; ‘हा कोणत्या अ‍ॅँगलनी हिरो दिसतो’!!

Web Title: Shooting was done for Juhi Chawla when she was seven months pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.