SHOCKING! साउथच्या या अभिनेत्रीनं केली आत्महत्या, Live चॅटदरम्यान पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 06:02 PM2022-05-18T18:02:34+5:302022-05-18T18:03:25+5:30

गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री डिप्रेशनचा सामना करत होती.

SHOCKING! This actress from the South committed suicide, ended her life by strangling a fan during a live chat | SHOCKING! साउथच्या या अभिनेत्रीनं केली आत्महत्या, Live चॅटदरम्यान पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन

SHOCKING! साउथच्या या अभिनेत्रीनं केली आत्महत्या, Live चॅटदरम्यान पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन

googlenewsNext

साउथ अभिनेत्री शेरीन सेलीन मॅथ्यूचे मंगळवारी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी २६ वर्षीय ट्रान्सवुमन मॉडेल तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. आत्महत्या करताना अभिनेत्री ज्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅटिंग करत होती, त्या व्यक्तीने शेरीनच्या हालचालीची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. मात्र, पोलिस अधिकारी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले तोपर्यंत शेरीनने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केलेली होती.

पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, शेरीनच्या जवळच्या लोकांनी माहिती दिली की अभिनेत्री डिप्रेशनमुळे त्रस्त होती आणि गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. या घटनेसंदर्भात पोलीस शेरीनच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवत आहेत. तपास प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह कलामसेरी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येणार आहे.


शेरीनने काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आणि मॉडेलिंगमध्ये सक्रिय होती. कोचीमध्ये गेल्या वर्षभरात ट्रान्सजेंडरने केलेल्या आत्महत्येची ही पाचवी घटना आहे.

Web Title: SHOCKING! This actress from the South committed suicide, ended her life by strangling a fan during a live chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.