सोना मोहपात्राचा धक्कादायक खुलासा; म्हणे,‘या’ गँगच्या टार्गेटवर होते माझे पती राम संपत...!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:29 PM2020-07-26T17:29:28+5:302020-07-26T17:30:23+5:30

तिने पुन्हा एकदा एक धक्कादायक खुलासा केल्याचे समोर आले आहे. नेपोटिजमच्या नावाखाली संगीत क्षेत्रातही माफियांनी अनेकांच्या ऑफर्स  काढून घेतल्या.

Shocking revelation of Sona Mohapatra; Saying, this was the target of the gang, my husband Ram Sampat ... !! | सोना मोहपात्राचा धक्कादायक खुलासा; म्हणे,‘या’ गँगच्या टार्गेटवर होते माझे पती राम संपत...!!

सोना मोहपात्राचा धक्कादायक खुलासा; म्हणे,‘या’ गँगच्या टार्गेटवर होते माझे पती राम संपत...!!

googlenewsNext

बॉलिवूडची लीडिंग गायिका सोना मोहपात्रा ही बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिने के लेले वक्तव्य हे सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात. यावेळेला मात्र ती प्रचंड भडकली आहे. ती का भडकलीये हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेलच. तर आम्ही सांगतो. तिने पुन्हा एकदा एक धक्कादायक खुलासा केल्याचे समोर आले आहे. नेपोटिजमच्या नावाखाली संगीत क्षेत्रातही माफियांनी अनेकांच्या ऑफर्स  काढून घेतल्या. सोना सांगतेय की, तिच्या पतीलाही बॉलिवूडच्या ‘सो कॉल्ड’ संगीतातील गँगने टार्गेट केले होते.

अलीकडेच ए. आर. रहमान यांच्या वक्तव्यामुळे बॉलिवूड क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यात आता भर पडलीय ती, सोनाच्या वक्तव्याने. तर झाले असे की, सोनाचे म्हणणे आहे, तिचे पती संगीतकार राम संपत यांनाही तथाकथित गँगने काम मिळू दिले नाही. त्यांना मिळणाऱ्या  ऑफर्स  दुसरीकडे जात असत. अचानक असे कसे काय होते? असा तिचा सवाल आहे. तिच्या पतीला तब्बल दोन वर्षे या सर्व प्रकारांचा सामना करावा लागला. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही खुप परिणाम झाला. पतीला दु:खी पाहून ती देखील प्रचंड दु:खी व्हायची. तिने तिच्या पतीला त्रास देणाऱ्यांना ‘अशिक्षित आणि स्वार्थी’ म्हटले आहे. 

नुकतेच ए. आर. रहमान यांच्या एका मुलाखतीची लिंक भाजपाचे नेता सुब्रम्हण्यम स्वामी यांनी टिवट केली आहे. यावर प्रतिक्रिया देत सोना म्हणते,‘ही अशिक्षित आणि स्वार्थी लोकांची गँग कायमच प्रामाणिक, प्रतिभावान आणि रचनात्मक व्यक्तींच्या विरूद्ध काम करते. मी यातून माझे पती संगीतकार राम संपत यांना जाताना पाहिले आहे. राम संपत यांनी ‘रईस’ या चित्रपटातून संगीत दिले आहे.’ त्यांनी आत्तापर्यंत ‘तलाश’, ‘खाकी’,‘देल्ही बेल्ही’,‘फुकरे’ आणि ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटातून संगीत दिले आहे. 

Web Title: Shocking revelation of Sona Mohapatra; Saying, this was the target of the gang, my husband Ram Sampat ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.