Shocking pakistani actor singer mohsin abbas haider wife fatema alleged domestic violence | धक्कादायक! या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
धक्कादायक! या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता, गायक व मॉडेल मोहसिन अब्बास हैदरवर त्याच्या पत्नीनं मारहाणीचा आरोप केला आहे. फातिमा सोहेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपबीती सांगितली आहे. तिने घरगुती हिसेंबाबत लिहिलं आहे. फातिमाने सांगितलं की, तिच्या नवऱ्याने तिला प्रेग्नेंट असतानाही वाईटरित्या मारहाण केलं होतं.

फातिमा सोहेलने सोशल मीडियावर लिहिलं की, अन्याय सहन करणंदेखील गुन्हा आहे. त्यानंतर फातिमाने तिच्यावर घडलेल्या अन्यायाबद्दल सोशल मीडियावर सांगितलं. फातिमाच्या अनुसार, २६ नोव्हेंबर, २०१८ साली मी नवऱ्याला मला फसविताना रंगेहाथ पकडले होते. मात्र त्यावेळी त्याला लाज वाटण्याऐवजी त्याने मला मारहाण केली. त्यावेळी मी प्रेग्नेंट होते. 


तिने पुढे सांगितलं की, त्याने माझे केस खेचले आणि मला जमिनीवर फरफटत नेलं. इतकंच नाही तर लाथादेखील मारल्या. मला उठवलं आणि तोंडावर मुक्के मारले आणि शेवटी भिंतीवर आपटून निघून गेला. मार खाल्यानंतर मी सदम्यात गेली होती. त्यानंतर मी कुटुंबातील कोणालाही सांगितलं नाही. माझ्या एका फ्रेंडला सांगितलं आणि तिच्यासोबत रुग्णालयात गेली. 


हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला. कारण त्यांना पोलिस केस वाटत होते. विनंती केल्यावर त्यांनी तिच्यावर उपचार केले आणि पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायला सांगितलं, असं फातिमाने सांगितलं व पुढे म्हणाली की, मी खूप वेळ विचार केला आणि तक्रार दाखल करायचं ठरवलं. पण मला वाटलं की ही योग्य वेळ नाही. त्यानंतर मी अल्ट्रा साऊंड केलं आणि त्यात कळलं की माझं बाळ सुखरुप आहे. त्यानंतर समाजातील दबावामुळे माझा आत्मविश्वास आणखीन कमकुवत झाला. या प्रकरणी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नाही केली.मला माहित नाही, मला काय झालं होतं. माझ्या बाळाच्या जन्माला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तक्रार केली नाही.

फातिमाने पुढे सांगितलं की, १९ मे रोजी मुलगा झाला. खुप सुंदर आहे. मात्र त्याला जन्म देण्यासाठी मला ऑपरेशन करावं लागलं. मी रुग्णालयात असताना तो गर्लफ्रेंडसोबत होता. दोन दिवसानंतर दिखावा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. मुलासोबत फोटो काढला आणि पोस्ट केला. त्याला बाळाची काळजी नाही. माझ्या कुटुंबानं मला हे प्रकरण दाबून ठेवायला सांगितलं. पण आता मी असं करणार नाही. मला आवाज उठवावा लागेल.
फातिमाने शेवटी मोहसिन आता मी तुला कोर्टात भेटेन असं सांगितलं. 
या सर्व प्रकरणावर मोहसिनने काहीही खुलासा केलेला नाही. त्याने पत्रकार परिषदेत या आरोपांचं उत्तर देईल आणि सर्व पुरावेही सादर करेन, असं सांगितलं.


Web Title: Shocking pakistani actor singer mohsin abbas haider wife fatema alleged domestic violence
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.