Shocking ...! kolkata uber cab driver arrested bengali tv actor swastika dutta facebook post | धक्कादायक...! उबर कॅब ड्रायव्हरनं या अभिनेत्रीसोबत भररस्त्यात केली गैरवर्तणूक
धक्कादायक...! उबर कॅब ड्रायव्हरनं या अभिनेत्रीसोबत भररस्त्यात केली गैरवर्तणूक

कोलकातामधील एका बंगाली टेलिव्हिजन अभिनेत्रीला एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. या अभिनेत्रीला १० जुलै रोजी उबर कॅब ड्रायव्हरने खाली उतरवलं आणि धमकी दिली. ही घटना ती शूटिंगसाठी जात असताना घडली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे स्वास्तिका दत्ता आणि ती बंगाली मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने या घटनेबद्दल तिच्या सोशल मीडियावर सांगितलं आणि आरोपीचा फोटो देखील शेअर केला. या कॅब ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 

स्वास्तिका दत्ता हिने सांगितलं की, बुधवारी (१० जुलै) तिच्या घरातून सकाळी शूटिंगला जाण्यासाठी तिने कॅब बुक केली होती. मात्र ड्रायव्हरने भररस्त्यात कॅब रद्द केली. या ड्रायव्हरचं नाव जमशेद आहे. त्याने मला घरून पिकअप केलं आणि रस्त्यात माझी ट्रीप कॅन्सल करून कारमधून खाली उतरायला सांगितलं.


तिने पुढे सांगितलं की, जेव्हा तिने कारमधून बाहेर पडण्यास नकार दिला आणि त्याने कार वळवली व त्याच्या एरियात नेऊन तिला शिव्या घातल्या. इतकंच नाही तर तो कार मधून उतरला आणि कारचा दरवाजा खोलून तिला कारमधून धक्का दिला. जेव्हा ती त्याच्यावर चिडली आणि लोकांकडे मदत मागितली. तेव्हा त्याने तिला धमकी दिली आणि इतर मुलांना तिथे बोलवलं. ड्रायव्हर म्हणाला, तु जे करू शकते ते कर. पाहतो मी तू काय करतेस.


स्वास्तिकाला शूटिंगसाठी उशीर होत असल्यामुळे ती तिथून निघून गेली. पण तिने त्यानंतर तिच्या वडिलांशी बोलली आणि ती त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. 


कोलकाता पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वास्तिका दत्ता हिला रिप्लाय दिला आहे. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणावर कोलकाता पोलिस कारवाई करत आहेत. 

Web Title: Shocking ...! kolkata uber cab driver arrested bengali tv actor swastika dutta facebook post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.