shobhaa de refuse to watch kabir singh film | Stalking is stalking! शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहण्यास शोभा डे यांचा नकार!!
Stalking is stalking! शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहण्यास शोभा डे यांचा नकार!!

ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ हा सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सध्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केली आहे.

शाहिद कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘कबीर सिंग’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाने प्रत्येकजण कौतुक करतोय. पण चित्रपटातील कंटेंटवर मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यापैकीच एक.

शोभा डे यांनी ट्वीटरवर या चित्रपटाच्या कंटेंटवर आक्षेप नोंदवला आहे. ‘मी कबीर सिंग हा सिनेमा पाहण्यास नकार देतेय. मी शाहिदची खूप मोठी चाहती आहे. पण स्टॉकिंग कुठल्याहीप्रकारे न्याय्य ठरवल्या जाऊ शकत नाही, ते स्वीकार्य नाही,’ असे ट्वीट शोभा डे यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा हिनेही शाहिदच्या या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. सोनाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग करत, या चित्रपटाला विरोध करणारे ट्वीट केले होते. ‘कुणाचेही या चित्रपटातील महिला विरोधी कथानकाकडे लक्ष गेले नाही? फक्त इंटेन्स अ‍ॅक्टिंग? हे खरोखरचं व्यथित करणारे आहे. तुम्ही तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात. भारतात महिलांच्या सद्यस्थितीबद्दल  काय अपेक्षा कराव्यात, हेच मला कळत नाही,’ असे ट्वीट तिने केले होते.  ‘भूमिका निवडण्यापूर्वी  कलाकाराने आपल्या जबाबदारीचे भान ठेवायला नको का?’ असा संतप्त सवालही तिने केला होता.
‘कबीर सिंग’ हा सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सध्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केली आहे. ओपनिंग वीकेंडमध्ये या चित्रपटाने 70.83 कोटींची कमाई केली. सध्या 100 कोटींकडे या चित्रपटाची वाटचाल सुरु आहे. शाहिद कपूरच्या करिअरमधील सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे.


Web Title: shobhaa de refuse to watch kabir singh film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.