Shobhaa De Calls 'Avengers: Endgame' A 'Boring' Film, So People Trolled her | म्हणे, ‘अव्हेंजर्स एंडगेम’ सर्वात कंटाळवाणा चित्रपट! शोभा डे झाल्या ट्रोल!!
म्हणे, ‘अव्हेंजर्स एंडगेम’ सर्वात कंटाळवाणा चित्रपट! शोभा डे झाल्या ट्रोल!!

ठळक मुद्दे‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची बॉक्स आॅफिसवरची ही घोडदौड बघता, एकट्या भारतात हा चित्रपट ४०० कोटींची कमाई करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

अव्हेंजर्स एंडगेम’ या हॉलिवूडपटावर जगभरात प्रेक्षकांच्या उड्या पडत असताना भारतातील एक व्यक्ति मात्र हा चित्रपट पाहून कमालीची निराश आहे. ही व्यक्ति कोण तर, सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे. होय, एकीकडे मार्व्हेल चित्रपटांच्या चाहत्यांनी ‘अव्हेंजर्स एंडगेम’चे तिकिट मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा चालवला असताना, शोभा डे यांना मात्र हा चित्रपट जराही भावला नाही. आत्तापर्यंतचा सर्वाधिक कंटाळवाणा चित्रपट, अशी प्रतिक्रिया त्यांनी हा चित्रपट पाहून दिली. ट्विटरवरची त्यांची ही प्रतिक्रिया वाचून चाहते संतापले नसतील तर नवल. सुपरहिरो फिल्म्सच्या चाहत्यांनी यानंतर शोभा डे यांना चांगलेच फैलावर घेतले.
अव्हेंजर्स एंडगेम’ म्हणजे कोट्यवधी डॉलर खर्चून केलेला विनोद आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक कंटाळवाणा चित्रपट आहे, असे ट्विट त्यांनी केले. त्यांचे हे ट्विट वाचून चाहते त्यांच्यावर संतापले आहेत. त्यांनी शोभा डे यांच्या ट्विटला ट्रोल करण्यास सुरवात केली.‘तुम्हाला नक्कीच चित्रपटच समजला नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांचे हे ट्विट वाचून एका चाहत्याने दिली. एका युजरने ‘आपको ठग्स आॅफ हिंदोस्तान अच्छी लगी थी ना,’ असे लिहित शोभा यांची ‘शोभा’ केली. ‘तुम्ही कलंक पाहा, ‘अव्हेंजर्स एंडगेम’ तुम्हाला झेपणारा नाही,’ असे एकाने लिहिले तर अन्य एकाने ‘याला जनरेशन गॅप म्हणतात,’ असे लिहित शोभा यांना ट्रोल केले.
एकीकडे शोभा डे यांनी ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ पाहून नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकछे या हॉलिवूडपटाने जगभरात कमाईचे सगळे विक्रम तोडण्याचा धडाका लावला आहे. भारतीय प्रेक्षकही याला अपवाद नाहीत. पहिल्या तीनच दिवसांत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ने भारतात १३० कोटींची कमाई करून एक विक्रम रचला. ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची बॉक्स आॅफिसवरची ही घोडदौड बघता, एकट्या भारतात हा चित्रपट ४०० कोटींची कमाई करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.


Web Title: Shobhaa De Calls 'Avengers: Endgame' A 'Boring' Film, So People Trolled her
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.