बाबो..! शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने मुलगा वियानला गिफ्ट केली लॅम्बोर्गिनी कार?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 04:42 PM2021-01-08T16:42:09+5:302021-01-08T16:42:37+5:30

राज कुंद्राने मुलगा वियानच्या वाढदिवसाला त्याला ही लक्झरी कार गिफ्ट केल्याचे बोलले जात होते.

Shilpa Shetty's husband Raj Kundra gifted Lamborghini car to son Vian? | बाबो..! शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने मुलगा वियानला गिफ्ट केली लॅम्बोर्गिनी कार?, जाणून घ्या याबद्दल

बाबो..! शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने मुलगा वियानला गिफ्ट केली लॅम्बोर्गिनी कार?, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. नुकतेच असे वृत्त समोर आले आहे की राज कुंद्राने आपला मुलगा वियानला लॅम्बोर्गिनी कार विकत घेऊन गिफ्ट केली आहे. यावर आता त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. हे वृत्त प्रकाशित करणाऱ्या मासिकावर त्याने टीका केली आहे.


राज कुंद्राने ट्विटरवर मासिकात छापलेले आर्टिकलची लिंक शेअर करत लिहिले की, विश्वसनीय मासिक, मात्र खूप वाईट रिसर्च करून लिहिलेले आर्टिकल. कृपया या आर्टिकलमध्ये उल्लेख करा की लॅम्बोर्गिनी एक टॉय लॅम्बोर्गिनी कार होती.#फेक न्यूज


आर्टिकलमध्ये सांगितले गेले होते की राज कुंद्राने मुलगा वियानच्या वाढदिवसाला त्याला ही लक्झरी कार गिफ्ट केली होती. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा वियानचा जन्म २०१२ साली झाला आहे. मागील वर्षी शिल्पा सरोगसीच्या मदतीने एका मुलीची आई झाली आहे. या मुलीचे नाव समीशा ठेवले आहे.


शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तेरा वर्षांनंतर ती सब्बीर खानच्या निकम्मा चित्रपटातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करते आहे. यात तिच्यासोबत अभिमन्यु दासानी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून शिर्ले सेथिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. हा चित्रपट जूनमध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

याशिवाय शिल्पा शेट्टी हंगामा २मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट २००३ साली रिलीज झालेल्या हंगामाचा सीक्वल आहे. यात शिल्पाशिवाय परेश रावल, मिझान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title: Shilpa Shetty's husband Raj Kundra gifted Lamborghini car to son Vian?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.